Homeमहामुंबईरायगडकिरवली जि.प.ची शाळा ठरली ‘सुंदर शाळा’

किरवली जि.प.ची शाळा ठरली ‘सुंदर शाळा’

Subscribe

नेरळ-; राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या शिक्षण विभागाने केंद्र स्तरावर, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर’मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या अभियानात कर्जत तालुक्यातील सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता.  रायगड जिल्हा परिषदेच्या किरवली शाळेने   भिसेगाव केंद्रातून किरवली  शाळेला पहिला क्रमांक  मिळविला आहे.  (The school of Kirvali district is the first ‘beautiful school’ in the district) तर किरवली शाळेची तालुक्यात ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. शासनाच्या शिक्षण विभागाकडून पारितोषिकाच्या रुपाने शाळेला २ लाखांचा धनादेश मिळाला आहे.

माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत शासनाच्या शिक्षण विभागाने आयोजित स्पर्धेत कर्जत तालुक्यात ४५ दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम ऑनलाईन शाळेची नोंदणी करून शाळेबद्दलची माहिती, उपक्रमांचे फोटो, अहवाल ऑनलाईन अपलोड केल्यानंतर प्रत्यक्षात शाळा तपासणी केंद्र प्रमुख पथकाकडून करण्यात आली. यामध्ये भिसेगाव केंद्रातून किरवली शाळेचा पहिला क्रमांक आला आहे. या शाळेची तालुकास्तरावर निवड झाली आहे.

या उपक्रमानुसार शाळेतील मंत्री मंडळ, शाळेची परस बाग, स्वच्छता मॉनिटर, बचत बँक, अशा विविध बाबींची विद्यार्थ्यांकडून पथकाने माहिती जाणून घेतली. दोन्ही तपासणीतून जिल्हा परिषदेच्या किरवली शाळेची तालुक्यात ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.

गट शिक्षणाधिकारी संतोष दौंड व केंद्रप्रमुख साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका हरवंदे, चित्रा पाटील, राजेंद्र रुपनवर, आकाराम पाटील, वैशाली पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बडेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ बडेकर, पोलीस पाटील विवेक बडेकर, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुनंदा बडेकर तसेच सदस्य सदस्या केंद्रातील शाळा व सर्व शिक्षक वृंद किरवली गावातील ग्रामस्थ माजी विद्यार्थी व पालक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.