पनवेल : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अगदी ‘इडिएट’ लेवलपर्यंत पोहोचला आहे. अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील दिवंगत प्रमोद केशव ठाकरू प्रवेशद्वाराच्या नामकरण कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा लक्ष्य केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रायगडमधील शिवसेनेच्या तीन आमदारांचा उल्लेख थ्री इडिएट्स असा करत तिन्ही आमदारांची खिल्ली उडवली आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाला पूर्णविराम लागण्याचे नाव घेत नाही. उलट रोज नवनवे आरोप, नवनवीन टीका दोन्ही बाजूंनी होत असून आरोपाला प्रत्यारोप असे धोरण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. अलिबाग तालुक्यातील कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांनी दगा दिल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर तटकरे हटाव अशी मोहीम जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे भविष्यात सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशाराही आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे.
हेही वाचा… Raigad Politics : त्या व्हिडीओत दडलंत तरी काय, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद व्हिडीओपर्यंत
आमदार महेंद्र दळवी यांच्या आरोपांना आणि टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाणा यांनी रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांचा थेट थ्री इडिएट्स असा उल्लेख केला आहे. एवढेच नाही तर माझी एकनाथ शिंदेसाहेंबाना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या थ्री इडिएट्सना आवर घालावा. महायुतीत त्यांच्यामुळे उगीचच मिठाचा खडा नको, असे सुनावले आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. त्यातील भरत गोगावले रोहयो मंत्री आहेत. तर त्यांना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे गोगावले यांना साथ देत आहेत.
हेही वाचा… Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद, कोण आहे अफजलखान, वाघ आणि कोण आहेत कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी शिवसेनेच्या तीन आमदारांचा उल्लेख थ्री इडिएट्स केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या टीकेला अजून शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. तरीही काही मंगळवारपर्यंत नक्कीच उत्तर दिले जाईल, अशी शक्यता आहे.
(Edited by Avinash Chandane)