पनवेल : राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्ता याने ‘नमो चषक 2025’ वर नाव कोरत तब्बल 1 लाख 11 हजारांचा पुरस्कार पटकावला आहे. या स्पर्धेत नौदलाचा पी. टी. अनबन उपविजेता ठरला, प्रथम उपविजेता मुंबईचा सागर कातुर्डे, उत्कृष्ट पोझर म्हणून मुंबई उपनगरचा हरमित सिंग याने तर प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू म्हणून पुण्याच्या विशाल सुरवसे याने मान मिळवला. सांघिक विजेतापद रायगड संघाने, उपविजेता म्हणून पुणे संघाने, तृतीय क्रमांक मुंबई उपनगर, चतुर्थ क्रमांक मुंबई तर सांघिक पाचवा क्रमांक ठाणे पश्चिम संघाने पटकावला. उलवा नोडमध्ये गुरुवारपासून (23 ते 25 जानेवारी) तीन दिवस नमो चषक क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरण यांनी नमो चषकचे आयोजन केले आहे.
हेही वाचा… Shardul thakur : शार्दुल ठाकूरचे नाबाद शतक, मुंबईला पुन्हा एकदा संकटातून सावरले

या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मोरे, सरचिटणीस अजय खानविलकर, नमो चषक स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, माजी स्थायी समिती सभापती अजय बहिरा, अमर म्हात्रे, विजय घरत, जयवंत देशमुख, भार्गव ठाकूर, अंकुश ठाकूर, विश्वनाथ कोळी, स्वप्नील ठाकूर, शैलेश भगत, स्पर्धा समन्वयक मयुरेश नेतकर, शरीरसौष्ठव स्पर्धा संयोजक दिनेश शेळके, विचुंबे ग्रापंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शरीरसौष्ठव स्पर्धेतील वजनी गटनिहाय विजेते
८५ वरील वजनी गट
प्रथम क्रमांक – पी. टी. अनबन (नौदल), 2. हरमित सिंग (मुंबई उपनगर ), 3. सोहम चाकणकर (पुणे ),
4. निलेश रेमजे (मुंबई), 5. अभिषेक लोंढे (मुंबई), 6. जीवन सकपाळ (मुंबई)
८५ किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – विशाल सुरवसे (पुणे), २. संदेश सामंत (सिंधुदुर्ग), ३. सुखदीप सिंग (रायगड), ४. अर्जुन शर्मा (ठाणे), ५. महेंद्र पाचपुते (पुणे), ६. ऋत्विक जाधव (पुणे)
८० किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – सागर कातुर्डे (मुंबई), २. कमलेश अंबारा (पुणे), ३. संजय प्रजापती (मुंबई), ४. अक्षय शिंदे (पुणे ),
५. प्रभाकर पाटील (रायगड), ६. सहावा क्रमांक सचिन हगवणे (पुणे)
७५ किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – भगवान बोराडे (मुंबई उपनगर), २. आकाश दडमल (पुणे), ३. उदय देवरे (रायगड), ४. विशाल धावडे (उपनगर), ५. मंगेश भोसले (पश्चिम ठाणे), ६. अक्षय शिंदे (पुणे)
७० किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – उमेश गुप्ता (उपनगर), २. स्वप्नील नरवडकर (नौदल), ३. संकेत भरम (उपनगर), ४. दीपक राऊळ (रायगड), ५. प्रशांत पोराळे (पुणे), ६. रोशन दळवी (कोल्हापूर)
६५ किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – उद्देश ठाकूर (रायगड), २. नरेंद्र व्हालेकर (पुणे), ३. संदीप सावळे (उपनगर ), ४. सचिन सावंत (पुणे), ५. निलेश धोंडे (पुणे), ६. सचिन बोईनवाड (पश्चिम ठाणे)
६० किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – बाळू काटे (पुणे), २. गणेश पाटील (रायगड), ३. जितेश मोरे (मुंबई), ४. जुगल शिवणे (रायगड),
५. सुयश सावंत (उपनगर), ६. अमोल वायल (पुणे)
५५ किलो खालील वजनी गट
प्रथम क्रमांक – हनुमान भगत (रायगड), २. राजेश तारबे (मुंबई), ३. अजय ओजरकर (पुणे), ४. संजय भोपी (रायगड), ५. दीपक कांबळे (पुणे). ६. संदेश भोईर (रायगड)
(Edited by Avinash Chandane)