HomeमहामुंबईरायगडUran News : लंगोटी मित्रांची Whatsapp दोस्ती, उरणमध्ये 1989 च्या दहावीच्या बॅचची...

Uran News : लंगोटी मित्रांची Whatsapp दोस्ती, उरणमध्ये 1989 च्या दहावीच्या बॅचची चर्चा

Subscribe

उरण : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या 1989 ची दहावी बॅच सध्या चांगलीच चर्चेत आहे. या विद्यार्थ्यांनी पनवेलमधील नेरे येथील शांतिवनातील बुजुर्गांसोबत दिवस घालवून वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. या बॅचमधील काही चांगल्या गायकांनी बुजुर्गांसमोर जुन्या-नव्या गाण्यांची सुमारे तीन तासांची मैफल जमवली. त्यातही ‘कभी अलविदा ना कहेना’ या गाण्याने सर्वांना डोलायला लावले. (Karmaveer Bhaurao Patil High School, Uran)

1989 मध्ये दहावीत एकत्र असलेले हे विद्यार्थी नंतर व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून जोडले गेले. आज हे शाळकरी मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 9 वर्षांपासून ते दरवर्षी मकर संक्रांतींच्या निमित्ताने वेगळा उपक्रम रावबत आहे. याचाच भाग म्हणून यावेळी त्यांनी पनवेल तालुक्यातील शांतिवनमधील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. या ग्रुपमधील प्रसिद्ध गायक देवेंद्र पाटील, राजेंद्र ठाकूर, युवराज पाटील आणि संदीप कोळी विकास म्हात्रे यांनी विविध भावगीते आणि भक्तीगीते सुमधुर आवाजात करत शांतिवनमधील ज्येष्ठांचे मनोरंजन केले. (Social Activities)

हेही वाचा…  

उरणच्या पूर्व भागातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन आणि भागशाळा खोपटेमधील 1989 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी ‘मैत्री असावी तर अशी’ व्हॉटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून मागील एक तपापासून बांधले गेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून ते सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

उरणमधील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या दहावीच्या 1989ची बॅच पनवेलमधील शांतिवनमध्ये ज्येष्ठांसोबत

विविध क्षेत्रात उत्तम कार्याचा ठसा उमटवणाऱ्यांचा सत्कार, दरवर्षी वनभोजन, वृद्धाश्रमात तिळगुळ आणि फळे वाटप आणि बुजुर्गांचे गाण्यांच्या मैफलीतून मनोरंजन करणे तर कधी आपल्याच ग्रुपमधील निवृत्त मेजर संतोष गावंड यांच्यासह कर्तृत्ववानांचा गौरव असे कार्यक्रम अगदी हटकून केले जातात. कृष्णा पाटील, समता पाटील, देवेंद्र पाटील, कांचन थळी, शोभा पाटील, विद्याधर पाटील, विश्वनाथ म्हात्रे, श्यामकांत पाटील, सुरेश म्हात्रे, दिनेश म्हात्रे, मेजर संतोष गावंड, लक्ष्मीकांत म्हात्रे, डी. बी. गावंड, प्रदीप पाटील, सुनील आणि अजित पाटील यांच्यासह 1989 च्या सर्व बॅचमेट यांनी हा कार्यक्रम केला.

(Edited by Avinash Chandane)