Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईरायगडMumbai Goa Highway : नवे मंत्री नवा दौरा, मुंबई गोवा महामार्ग रखडलेलाच, कधी संपणार कोकणवासीयांचा वनवास

Mumbai Goa Highway : नवे मंत्री नवा दौरा, मुंबई गोवा महामार्ग रखडलेलाच, कधी संपणार कोकणवासीयांचा वनवास

Subscribe

पनवेल : श्रीरामाने 14 वर्षांच्या वनवासात रामसेतू बांधला होता. मात्र, मुंबई-गोवा महामार्ग 15 वर्षांपासून रखडल्याने कोकणवासीयांच्या आणि त्यातही रायगडवासीयांचा महामार्गाचा वनवास केव्हा संपेल, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याला निमित्त ठरले आहे ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे नवे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्याचे!

मंत्री झाले, दौरे केले, पुढे काय?

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले की पहिला प्रश्न मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग केव्हा पूर्ण होणार, असा असतो. मग सुरू होतात मंत्र्यांचे पाहणी दौरे. गेल्या 11 वर्षांत अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे पाहणी दौरे केले आहेत. सर्वाधिक दौरे रवींद्र चव्हाण यांनी केले आहेत.

हेही वाचा…  Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रखडला

शिवेंद्रराजे भोसले यांचा दौरा

गुरुवारी (20 फेब्रुवारी) नवे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पळस्पे ते कशेडी घाट अशी पाहणी केली. वाटेत त्यांची स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी भेट घेतली आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली. माणगाव, इंदापूर बायपास या रस्त्यांच्या नव्याने निविदा काढण्यात आल्या असून निविदा प्रक्रियेचे काम आठवड्यात पूर्ण होईल, असे भोसले यांनी सांगितले. तसेच विविध ठिकाणच्या सर्विस रोडची कामे एप्रिलअखेर मार्गी लागतील, असेही स्पष्ट केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी संपूर्ण आढावा घेतला. यापूर्वीही सर्व मंत्र्यांनी दौरे केले, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, लोकांची निवेदने स्वीकारली. पुढे फारसे काही घडले नाही. तसे शिवेंद्रराजे भोसले यांनीही केले. त्यामुळे आता पुढे काय, असा सवाल नव्या मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर विचारला जात आहे.

दुपदरीच्या चौपरीकरणाचा गोंधळ

मुंबई ते गोवा मुळात दुपदरी महामार्ग होता. यूपीए सरकारच्या काळात त्यांचे रुंदीकरण करून तो चौपदरी करण्याचा 2007 मध्ये निर्णय झाला. त्यामुळे 12 तासांचा प्रवास 7 तासांवर येणार होता. प्रत्यक्षात 2010 पर्यंत कामाला सुरुवात झाली नव्हती. 471 किलोमीटरचा मुंबई-गोवा महामार्ग करण्यासाठी 2012 मध्ये कामाला सुरुवात झाली. त्यामुळे 7 हजार 500 कोटींचा खर्च 15 हजार कोटींवर गेला. एवढे होऊनही काम पूर्ण झालेले नाही. पनवेलजवळील पळस्पे ते इंदापूर हा 84 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला 2010 मध्ये सुरुवात झाली. हे काम 14 वर्षांनंतरही रखडलेलेच आहे.

पहिली रखडपट्टी कर्नाळ्यात

४७१ किलोमीटरच्या मार्गापैकी पनवेल ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा मार्ग बांधण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. तर उर्वरित काम राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते करत आहे. मात्र, याच पनवेल ते इंदापूर महामार्गात अनेक अडचणी आल्या. मुख्य अडथळा होता तो कर्नाळा पक्षी अभयारण्याचा. या भागातून मार्ग काढणे आव्हानात्मक होते. प्रकरण न्यायालयात गेले होते. 6 वर्षांनंतर 2015 मध्ये या रस्त्याला परवानगी मिळाली. तोपर्यंत पनवेल ते इंदापूर या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नियुक्त केलेला कंत्राटदार आर्थिक डबघाईत गेल्यामुळे कामाला ब्रेक लागला. पुढे 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामासाठी दुसरा कंत्राटदार नेमला.

रायगडमध्ये अडथळ्यांची शर्यत

रायगड जिल्ह्यातील कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते लोणेरे या टप्प्यातील कामे रखडली आहेत. इंदापूर आणि माणगावच्या बाह्यवळण रस्त्यांचे काम ठप्प आहे. कोलाड आणि लोणेरे येथील उड्डाणपुलांची कामे जेमतेम सुरू आहेत. वडखळ ते टेमपाले दरम्यान पाच उड्डाणपुलांची कामांना वेगाची गरज आहे. सिंधुदुर्ग ते राजापूर या मार्गाचा अपवाद वगळला तर रत्नागिरीत महामार्गाची कामे अनेक ठिकाणी रखडली आहेत. आरवली ते सावर्डे रस्त्याची अनेक ठिकाणी दुर्दशा झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमधील कामांची सह्यस्थिती

वाशीनाका पुलाचे नवे काम

पेण तालुक्यातील वाशी नाक्याजवळ नवीन पूल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास मंत्रीमहोदयांनी सांगितले आहे. आता हा प्रस्ताव केव्हा बनणार, पुलाची निविदा केव्हा निघणार, पुलाचे काम केव्हा सुरू होऊन संपणार याबाबत आधीचा इतिहास पाहता काहीही बोलता येणार नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे रखडण्याची भीती रायगडवासीयांना वाटत आहे.

(Edited by Avinash Chandane)