Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईRaj Thackeray : पालिका निवडणुकीआधी मनसे ऍक्शन मोडवर, राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

Raj Thackeray : पालिका निवडणुकीआधी मनसे ऍक्शन मोडवर, राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

Subscribe

मुंबई : आगामी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने ऍक्शन मोडवर आली आहे. शुक्रवारी (21 फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी साधलेल्या संवादात त्यांनी सांगितले की, “मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मुंबई पालिकेवर सध्या ताण असून त्यासाठी दोन विषयांवर पालिका आयुक्तांशी चर्चा केली. एक म्हणजे मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्सच्या असतील किंवा अदानी यांच्या असतील. त्यांच्याकडून महापालिकेने पैसे घ्यायला हवेत,” असा सल्ला त्यांनी यावेळी आयुक्तांना दिल्याचे सांगितले. (Raj Thackeray meet MNC Commisioner bhushan gagrani MNS in action mode)

हेही वाचा : Manikrao Kokate : शिक्षा ठोठावलेल्या माणिकरावांना आणखी झटका बसण्याची शक्यता 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या ज्या केबल्स आहेत, मग त्या रिलायन्स, अदानी किंवा कोणत्याही कंपनींच्या असतील. आज मुंबई महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अशामध्ये त्यांच्याकडून कोणताही कर घेतला जात नाही. मनपा सर्व नागरिकांकडून कचरा संकलनासाठी कर घेते. परंतु मनपाच्या जमिनीखाली जाणाऱ्या केबलसाठी कर का लावत नाही? तो कर लावला तर 8 ते 10 हजार कोटींचे उत्पन्न मनपाला मिळेल. सर्वांना कर लावले जात आहे, मग जमिनीखाली केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून कर का आकारला जात नाही? त्या कंपन्या धर्मादाय संस्था नाही. त्या स्वत: त्यातून नफा कमावतात.” अशी माहिती त्यांनी दिली.

“महानगरपालिकेचे रुग्णालये हा दुसरा विषय होता. मुंबई, महाराष्ट्रातून येणाऱ्या रुग्णांचा विषय नाही. पण, परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा जो विषय आहे, त्याचे ओझे या महानगरपालिकेंच्या रुग्णालयांवर पडते आणि त्यानंतर सर्व परिस्थिती बिघडते. मुंबई महानगरपालिकेला या सर्व गोष्टींचे ओझे वाहावे लागत आहे. इतर राज्यातील रुग्ण नको किंवा हवेत हा विषय नाही. पण इतर राज्यातील जे रुग्ण आहेत, तिकडच्या महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेला पैसे देत आहेत का? की नुसतेच आपण रुग्ण बघायचे आहेत तसेच आपल्या शहरावरील किंवा रुग्णालयावरील भार वाढवायचा आहे? या दृष्टीकोनातून वेगळे दर करता येतील का? कसे करता येतील? यावर आमचे बोलणे झाले.” असे राज ठाकरे यांनी सांगितले.