HomeमहामुंबईBMC Budget 2025 : बीएमसीचा मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे वाचा एका...

BMC Budget 2025 : बीएमसीचा मुंबईकरांना दिलासा, अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

Subscribe

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प 74427.41 कोटी रुपये आकारमान असलेला, मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, मंगळवारी सादर केला. हा अर्थसंकल्प 74427.41 कोटी रुपये आकारमान असलेला, मुंबईकरांना अधिकाधिक सेवासुविधा, नवीन प्रकल्प, योजना, विकासकामे देणारा आणि 60.65 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर एक नजर टाकूया… (Read important points of BMC budget with one click)

  1. अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ प्रस्तावित केलेली नाही
  2. महसुली उत्पन्नात 410 कोटींची वाढ अपेक्षित
  3. महसुली खर्चात 75 टक्क्यांवरून 42 टक्क्यापर्यंत कपात
  4. भांडवली खर्चात 25 टक्क्यांवरून 58 टक्क्यापर्यंत रु. 43000 कोटी वाढ
  5. उत्पन्नाच्या स्त्रोतात विविध मार्गाने 3000 कोटी पर्यंत वाढ अपेक्षित
  6. गुंतवणुकीवरील व्याज दरात अर्धा टक्का वाढ
  7. प्रीमियम एफ.एस.आय. शुल्कापैकी 50 टक्के वाटा महापालिकेस 300 कोटी अपेक्षित
  8. व्ही.एल. टी. टू लीज धोरणा अंतर्गत 2000 कोटी वाढ अपेक्षित
  9. अग्निशमन शुल्काद्वारे 769 कोटी उत्पन्न अपेक्षित
  10. टोल नाक्याच्या रिकाम्या जागांचा पार्किंग व अन्य व्यावसायिक वापर
  11. झोपडपट्टीतील व्यावसायिक आस्थापनावर मालमत्ता कर आकारणी
  12. प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सोलर पॅनल महापालिकेच्या मालमत्तांसाठी राबविणारा

हेही वाचा – BMC Budget 2025 : मुंबईच्या झोपडपट्टीतील व्यावसायिकांना पालिकेचा दणका, वाचा सविस्तर

पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

  1. आजतागायत 1333 किमी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरण पूर्ण
  2. यावर्षी 698 रस्त्यांचे काम प्रगतीपथावर तसेच फेज 2 मध्ये 1420 रस्त्यांचे काम अंतर्भूत
  3. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात असू याठिकाणी जलद व सुकर वाहतुकीसाठी एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट कार्यान्वित
  4. महामार्गालगत वाहनतळ उभारणार आणि डिजिटल पार्किंग अॅपद्वारे वाहनतळ आरक्षण होणार
  5. दक्षिण मुंबईत बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ (रोबोटिक पार्किंग)
  6. मरीन ड्राईव्ह सागरी किनारा मार्ग पहिला टप्प्यातील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे 95 टक्के काम पूर्ण
  7. सागरी किनारा मार्ग दुसरा टप्प्यात वांद्रे-वर्सोवा-दहिसर-भाईंदर काम प्रगतीपथावर
  8. गोरेगांव-मुलुंड लिंक रोड प्रगतीपथावर
  9. मलजल प्रक्रिया केंद्रांचे काम प्रगतीपथावर
  10. घाटकोपर व भांडूप मलजल प्रक्रिया केंद्रातून 2000 एम.एल.डी. पाणी पिण्याव्यतिरिक्त उपयोगासाठी उपलब्ध होणार
  11. जलबोगद्यांचे काम प्रगतीपथावर यामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणावर थांबविण्यात यश
  12. उड्डाणपुलांच्या कामास गती देणार
  13. मुंबईत विकास प्रकल्पाने बाधित 37782 बांधकामांना पर्यायी जागा देण्यासाठी 10,000 सदनिका खाजगी विकासकाकडून बांधून मिळणार
  14. रुग्णालयांचा पुनर्विकास आणि नवीन रुग्णालयांच्या बांधकामातून मुंबईत 3515 अतिरिक्त बेड्स उपलब्ध होणार
  15. 250 आपला दवाखाना कार्यरत असून यावर्षी अतिरिक्त 25 आपला दवाखाना सुरू होणार
  16. नायर येथे कॅन्सर रुग्णालयाचे काम सुरू
  17. के.ई.एम. येथे आयुष्यमान शताब्दी टॉवर उभारणार
  18. घरोघरी आरोग्य तपासणी सुरू ठेवणार
  19. रुग्णालय व्यवस्थापनासाठी H.M.I.S. (Hospital Management Information System) प्रणाली कार्यरत करणार
  20. महापालिकेच्या 479 शाळा इमारतीची दर्जोन्नती, 4 नवीन सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूल, 220 कौशल्य विकास केंद्र कार्यरत
  21. धूळ आणि धूर नियंत्रणासाठी पर्यावरण व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू ठेवणार. तसेच वायु प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना राबविणार
  22. बेस्टला 1000 कोटी अर्थसहाय्य
  23. महापालिकेच्या ठेवी 82,854 कोटी
  24. देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती
  25. बांधकाम व निष्कासन कचऱ्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प
  26. मुलुंड क्षेपणभूमी येथे जमीन पुन:प्राप्त करणे

हेही वाचा – BMC Budget 2025 : उत्पनाचे स्रोत मुंबई महापालिकेकडे नाहीत, बजेटवर काय म्हणाले रवी राजा?