Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईBMC Recruitment Results : मुंबई मनपाच्या कार्यकारी सहायक पदांचा निकाल जाहीर

BMC Recruitment Results : मुंबई मनपाच्या कार्यकारी सहायक पदांचा निकाल जाहीर

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान कार्यकारी सहायक पदासाठी परीक्षा घेतली होती. एकूण 1846 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. आता मोठ्या प्रतीक्षेनंतर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान कार्यकारी सहायक पदासाठी परीक्षा घेतली होती. एकूण 1846 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. आता मोठ्या प्रतीक्षेनंतर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पदांसाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते. अखेर, या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे. त्यामुळे, या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना येथील वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. (Result of Executive Assistant Posts of Mumbai Municipal Corporation announced)

मुंबई महानगरपालिकेची महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख आहे. पण या महानगरपालिकेत अनेक पद रिक्त आहेत. त्यामुळे यापैकी कार्यकारी सहायक पदासाठी 2 डिसेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2024 आणि 11 डिसेंबर 2024 ते दिनांक 12 डिसेंबर 2024 या कालावधीदरम्यान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून अनेकांनी अर्ज भरले होते. या 1 हजार 846 पदांसाठी एकूण 1 लाख 11 हजार 637 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 91 हजार 252 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. याच परीक्षेचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. एकूण 1734 पानांचा हा निकाल असून यामध्ये सर्व 91 हजार 252 उमेदवारांचा निकाल (गुण) समाविष्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर ‘उज्ज्वल संधीकरिता/ सर्व नोकरीच्या संधी/ प्रमुख कर्मचारी अधिकारी’ या सदरामध्ये हा निकाल उपलब्ध आहे.

हेही वाचा… NMMC Budget : नवी मुंबईच्या अर्थसंकल्पाची भविष्याकालीन झेप, करवाढ नाही, विकासकामांना प्राधान्य

तसेच, भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेनं कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक पदाच्या भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध केली होती. या पदांसाठीच्या जाहिरातीमध्ये पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यात आली होती. मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक पदाच्या 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे, नोकरभरतीची तयारी करणारे विद्यार्थी, राजकीय नेते यांच्याकडून पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यासंदर्भात मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर मुंबई महापालिका प्रशासनानं या मागणीची दखल घेत अट काढून टाकत असल्याची घोषणा करत नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करू, असे म्हटले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने दुसऱ्यांदा जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले.