मुंबई – शिवसेना ठाकरे गटानंतर आता ‘ऑपरेशन टायगर’चा मोर्चा काँग्रेसकडे वळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ असलेले पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी भेट घेणार आहेत. यानंतर त्यांचा शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांनी विचारांशी प्रामाणिक राहात पुढील 30-40 वर्षांचे राजकारण समोर ठेवून निर्णय घेतला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
आमदार रोहित पवार विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, केवळ तीन-चार वर्षांचा विचार रवींद्र धंगेकरांनी करु नये. सत्ता येत-जात असते. नगरसेवक पदापासून ते काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे पुढील 30-40 वर्षांचा विचार करुन त्यांनी राजकारणात निर्णय घ्यावा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.
भाजपच्या बालेकिल्ल्यातील विजयाने राज्यात चर्चेत आले रवींद्र धंगेकर
रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. मार्च 2023 मध्ये पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. कसबा पेठ मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला पराभूत करुन रवींद्र धंगेकर संपूर्ण राज्यात चर्चेत आले. निवडणुकीदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर? असा सवाल केला होता. त्यांच्या प्रश्नाला धंगेकरानी विजयाने उत्तर दिले होते.
पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर रवींद्र धंगेकर हे पुण्यातील बार, हुक्का पार्लर येथे उशिरा रात्रीपर्यंत सुरु असलेला धिंगाणा हा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरले होते. यामुळेही ते राज्यात चर्चेत आले होते. नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धंगेकरांचा पराभव झाला. भाजपचे हेमंत रासणे विजयी झाले आहे.
विधानसभा पराभवानंतर धंगेकर हे शिंदेच्या शिवसेनेजवळ गेले. काही दिवसांपूर्वीच मंत्री उदय सामंतांनी त्यांची भेट घेतली होती. आज धंगेकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट होणार आहे. त्यानंतर ते शिवसेना प्रवेशाची घोषणा करणार आहे.

येणारा हा आपल्याच विचारांचा – रोहित पवार
माजी आमदार धंगेकरांच्या संभावित शिवसेना (शिंदे) प्रवेशावर रोहित पवार म्हणाले की, विरोधी पक्षात असताना काही संकट आणि त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र आपण आपली विचारधारा सोडता कामा नये. धंगेकरांवर काही केसेस दाखल झाल्याची चर्चा आहे. त्याचा उल्लेख टाळून रोहित पवार म्हणाले, माझ्या कारखान्याचीही सत्ताबदलानंतर चौकशी सुरु आहे. मात्र त्यासमोर हार न मानता विचारधारेसाठी आपल्याला लढायचे आहे. त्यांनी फक्त तीन-चार वर्षांचा विचार न करता पुढील 30-40 वर्षांचे राजकारण बघावे, येणारा काळ हा आपल्याच विचारांचा असेल असं रोहति पवार म्हणाले.
हेही वाचा : Maharashtra Budget 2025 : निवडणुकीतील आश्वासनांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसेल, रोहित पवारांची अपेक्षा