Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईSada Sarwankar : माहीम मतदारसंघात पुन्हा लढाई; सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात HCमध्ये धाव

Sada Sarwankar : माहीम मतदारसंघात पुन्हा लढाई; सदा सरवणकरांची आमदार महेश सावंतांविरोधात HCमध्ये धाव

Subscribe

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर म्हणून ओळखला गेलेला माहीम विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांच्यात वाद सुरू झाला आहे.

Sada Sarvankar On Mahesh Sawant मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर म्हणून ओळखला गेलेला माहीम विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्यानुसार, माजी आमदार सदा सरवणकर यांनी विद्यमान आमदार महेश सावंत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Sada Sarvankar Petition In High Court Against MLA Mahesh Sawant Mahim Assembly Constituency)

माजी आमदार सदा सरवणकर यांनी आमदार महेश सावंत यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान देणारी आहे. या याचिकेवर 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सदा सरवणकरांच्या याचिकेत काय?

मुंबई उच्च न्यायालयात सदा सरवणकर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत महेश सावंत यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रार चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञपत्रात दाखवणे आवश्यक मात्र जनतेची दिशाभुल करुन स्वत:वरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली, असा आरोप महेश सावंत यांच्यावर याचिकेतून केला आहे.

कोण आहेत महेश सावंत?

महेश सावंत 1990 पासून शिवसेनेत सक्रीय आहेत. महेश सावंत यांचे वडील देखील शिवसेनेत कार्यरत होते. सावंत यांची ओळख माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक अशी होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी महेश सावंत यांनी देखील त्यांच्यासोबत पक्ष सोडला होता. मात्र, महेश सावंत पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत महेश सावंत हे सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचा पराभव करत आमदार झाले.

माहीम विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याचे पूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यामध्ये ठाकरे गटाचे महेश सावंत यांनी बाजी मारली. अमित ठाकरेंचा पराभव करून, उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत ‘जायंट किलर’ ठरले आहेत. महेश सावंत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सदा सरवणकर यांचा 1 हजार 340 मतांनी पराभव केला. तसेच, अमित ठाकरे हे माहीममध्ये निवडणूक लढवत असल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला होता. अमित ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली.


हेही वाचा – Sanjay Raut : फिक्सर ओएसडी, पीए यांची नावे देणारे मंत्री कोण? राऊतांनी मागितली यादी