Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईBhushan Gagrani : सेव्हन हिल्स रुग्णालयाची आयुक्तांकडून झाडाझडती

Bhushan Gagrani : सेव्हन हिल्स रुग्णालयाची आयुक्तांकडून झाडाझडती

Subscribe

मुंबई महापालिकेकडून खासगी सार्वजनिक सहभाग प्रकल्प अंतर्गत मरोळ (अंधेरी पूर्व) येथे काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाला मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रविवारी भेट दिली.

मुंबई : मुंबई महापालिकेकडून खासगी सार्वजनिक सहभाग प्रकल्प अंतर्गत मरोळ (अंधेरी पूर्व) येथे काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाला मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी रविवारी भेट दिली आणि तेथील वैद्यकीय सेवासुविधा, स्वच्छता आणि वाहन पार्किंग आदींबाबत झाडाझडती घेतली. (Seven Hills Hospital Commissioner Bhushan Gagrani slams him)

सेव्हन हिल्स रूग्णालयातील प्रमुख वैद्यकीय सुविधा, 50 रुग्णशय्या असलेल्या अतिदक्षता विभागातील सेवा-सुविधा, डायलिसिस सेवा, रोग निदान, बाह्यरूग्‍ण विभाग आणि त्यासोबतच वाहनतळ आणि इतर ठिकाणी जाऊन स्वच्छता, देखभाल इत्यादी कार्यवाही सुव्यवस्थित होते आहे किंवा कसे याची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारूद्र कुंभार, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सल्लागार शंकर कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते.

हेही वाचा – Santosh Deshmukh : हत्येपूर्वी सरपंचाला अमानुष मारहाण, 15 व्हिडीओ आणि फोटो आले समोर

सेव्हन हिल्स रूग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी माहिती दिली की, मुंबईतील पश्चिम उपनगरांसह लगतच्या पूर्व उपनगरातील रुग्ण या रुग्णालयात येतात. या ठिकाणी विशेष तसेच अतिविशेष स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. सद्यस्थितीत 306 रूग्णशय्या क्षमता असलेल्या या रुग्णालयात कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, मेडिसीन सर्जरी यासह अनेक उपचार सेवा पुरविण्यात येतात. सीप्झ, विमानतळ आदी ठिकाणाहून तातडीचे उपचार आवश्यक असणारे रुग्ण देखील येथे येतात. परिसरातील मरोळ, सीप्झ आदी मेट्रो रेल्वे स्थानके लक्षात घेता नागरिकांना सेव्हन हिल्स रुग्णालयात येणे अधिक सोयीस्कर होऊ लागले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

विशेष कार्य अधिकारी डॉ. कुंभार यांनी म्हटले की, सेव्हन हिल्स रुग्णालयातील एकूण 306 रुग्णशय्यांपैकी 20 टक्के म्हणजे 61 रुग्णशय्या मुंबई महापालिका संदर्भित रूग्णांसाठी राखीव आहेत. या राखीव रूग्णशय्या सुविधा अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजना आदींची रुग्णालयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयाशी संबंधित प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (Natinal Company Law Tribunal) यांच्याकडे न्यायप्रविष्ट आहे, अशी प्रशासकीय कार्यवाहीची संक्षिप्त माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – Ajit Pawar : तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही…; अजितदादांचा एकनाथ शिंदेंना चिमटा