Aaditya Thackeray On BJP : मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईतील कालिदास नाट्यगृहात निर्धार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या उद्घाटनपर भाषणात ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. बहुमतातलं सरकार सत्तेत आलं, पण याच भाजपातले अनेक लोक आम्हाला विचारतात, आपलं सरकार कसं आलं. महायुतीतील अनेकांची हीच भावना असल्याची टिप्पणी त्यांनी केली. (shiv sena ubt leader aaditya thackeray nirdhar melava attacks on bjp and spoke on lok sabha vidhan sabha elections)
लोकसभा निवडणुकीतील यश आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव, यावरही आदित्य ठाकरेंनी यावेळी भाष्य केले. लोकसभेत आपल्याला चांगलं यश मिळाले. त्यानंतर पदवीधर आणि सिनेट निवडणूक आपण जिंकलो. विधानसभा निवडणुकीतही आपण आपली घोडदौड सुरू ठेवली असती. पण व्होटर फ्रॉड झाला आणि त्यामुळे आपण हरलो. तो पराभव आपण स्वीकारला असला तरी येथून पुढे मुंबई, ठाणे, नागपूरला जाऊन लोकांना याची जाणीव करून द्यायला हवी, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – Uday Samant : महामार्गावरील खड्ड्यांच्या पॅचवर्कमध्ये घोळ, घोटाळा करणारी कंपनी सामंत यांच्या वडिलांची?
तुम्ही मविआला दिलेले मत महायुतीला कसं फिरवलं, हे लोकांना सांगावं लागेल. हा व्होटर फ्रॉड झाला नसता तर आपण जिंकलेलेच होतो. काही काळापूर्वी दिल्लीत संजय राऊत, राहुल गांधी आणि सुप्रिया सुळे यांनी समोर आणला होता. खोटी मतदार नोंदणी करून मते कशी खाल्ली ते लोकांसमोर आणावेच लागेल, ते जनतेला सांगावेच लागेल, असेही त्यांनी सांगितले.
2022 ला गद्दारांनी सरकार पाडलं. त्यावेळी त्यांनी सरकार बनवलं पण आता सरकार त्यांचं आलंय, हा विश्वासच त्यांना बसत नाही. अजूनही जुने भाजपवाले विचारतात की, आपलं सरकार आलं कसं? जुने भाजपावाले म्हणजे वाजपेयी – आडवाणींच्या काळातील भाजपा. आजची भाजपा ही खरी नाही तर ती कॉन्ट्रॅक्टर्सची भाजपा आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : IND vs NZ च्या अंतिम सामन्यात सर्वाधिक पसंती या संघाला, सट्टा बाजार तापला