Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईUddhav Thackeray : कोकणातून पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का; रामदास कदम, योगेश कदम यांची नवी जुळवाजुळव

Uddhav Thackeray : कोकणातून पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का; रामदास कदम, योगेश कदम यांची नवी जुळवाजुळव

Subscribe

मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर शिवेसनेला (ठाकरे) गळती लागली आहे. विशेषतः कोकणातून ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने, गणपतराव कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेला जय महाराष्ट्र केला आणि एकनाथ शिंदेंच्या सेनेते प्रवेश केला. आता पुन्हा एकदा कोकणातून उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दापोलीचे उपनराध्यक्ष यांच्यासह सहा नगरसेवकांनी ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे सेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थित प्रवेश सोहळा होणार आहे.

शिवसेनेने (शिंदे)‘ऑपरेशन टायगर’ सुरु केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरची घोषणा केली आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक जण पक्ष सोडून जात आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा असलेल्या राजन साळवी यांनीही ठाकरेंची साथ सोडली. आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे. या ठिकाणावरुन उपनगराध्यक्षासह सहा नगरसेवक ठाकरे यांची साथ सोडत आहे. या सर्वांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावून वेगळा गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले होते.

नगरपालिकेतील सत्तेच्या दृष्टीने शिंदे गटाकडून जुळवाजुळव सुरु झाल्याचे मानले जात आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतून शिंदे गटात गेलेले आणि उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा वेगळा गट तयार झाला आहे. या गटात एकूण 14 नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी नगरपालिकेत अल्पमतात आली आहे. या सर्व 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावून वेगळा गट तयार केला. या गटाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. हा गट दापोली नगराध्यक्षांवर लवकरच अविश्वास ठराव आणणार आहे.

उद्धव ठाकरेंचे प्रयत्न पडले कमी

शिवसेनेतून होणारी गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून तातडीचे उपाय केले गेले होते. बैठकांचे सत्र शिवसेना भवन येथे झाले. मात्र त्यांचे हे प्रयत्न कमी पडल्याचे दापोलीतील नगरसेवकांच्या गच्छंतीमुळे समोर आले. आमदार भास्कर जाधव देखली शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : Chal Halla Bol movie : जातीयवादी व्यवस्थेला तेव्हाही नामदेव ढसाळ यांचा राग होता, आव्हाडांची टीका