मुंबई । अंबरनाथ येथे एकदिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलन शनिवारी २४ फेब्रुवारीला होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे आहेत. संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बी. अनिल तथा अनिल भालेराव आहेत. यावेळी भव्य संविधान रॅली काढून संमेलनाला सुरुवात होणार आहे. या साहित्य संमेलनात ‘संविधान, मराठी साहित्यातील बहुजनांचे योगदान’ या विषयांवर परिसंवाद होणार आहे. यात ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे, संजय सोनवणे आदी सहभागी होणार आहेत. या सहित्य संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून कवी, लेखक आणि रसिक सहभागी होणार आहेत. या संमेलनाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. संमेलन यशस्वी होण्यासाठी शामराव सोमकुवर, धनंजय सुर्वे, सुनील दुपटे, सुधाकर सरवदे परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी ९८६०१३३९५० या क्रमांकावर संपर्क साधावा.