Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेBadlapur : कुळगाव- बदलापूर नगर परिषदेचा ६१९ कोटींचा अर्थसंकल्प

Badlapur : कुळगाव- बदलापूर नगर परिषदेचा ६१९ कोटींचा अर्थसंकल्प

Subscribe

बदलापूर । कुळगाव बदलापूर नगर परिषदेने सन २०२४-२५ चे सुधारित आणि सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. ६१९.५२ कोटी रुपये खर्चाचा तसेच ५ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प असून त्यामध्ये कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना लेखापाल विकास चव्हाण यांनी सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर केले.

यावेळी नगर अभियंता विजय पाटील, उपमुख्याधिकारी केतन गुजर, सह. लेखापाल शेखर गाडे, वरिष्ठ लिपिक पुंडलिक राठोड आदी उपस्थित होते. या अर्थसंकल्पात रस्ते बांधणीसाठी रुपये २.५ कोटी, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) रुपये ५० कोटीची तरतूद केलेली आहे. तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) रुपये १०० कोटी, घनकचरा व्यवस्थापन रुपये ३४ कोटी व आपत्ती व्यवस्थापन रुपये २५ लक्ष ची तरतूद केलेली आहे. महिला व बालकल्याणसाठी रुपये १.३९ कोटी, दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी रुपये १.३९ कोटी, ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी रुपये १० लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे .उद्यान विकास ७५ लाख, पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी ४.२५ कोटी, नालेसफाईसाठी ५० लाख, वृक्ष लागवड संवर्धनासाठी ११ कोटींची तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.