HomeमहामुंबईठाणेBhivandi : भिवंडीत एक हजारहून अधिक तर राज्यात दोन लाख बांगलादेशी

Bhivandi : भिवंडीत एक हजारहून अधिक तर राज्यात दोन लाख बांगलादेशी

Subscribe

किरीट सोमय्या यांचा दावा

भिवंडी । भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात एक हजाराहून अधिक बांगलादेश नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिले आहेत. यापैकी शेकडो बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखला म्हणून स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात दोन लाख बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला. या बांगलादेशी नागरिकांना पुरावा म्हणून शासकीय कागदपत्रे देणार्‍या अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी प्रसारमाध्यांना दिली.

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. ठिकठिकाणी छापेमारी करून बांगलादेशी नागरिकांची धरपकड करीत आहेत. एकट्या भिवंडी शहरात गेल्या वर्षभरापासून ते आतापर्यत ८० हून अधिक बांगलादेशी नागरिक वास्तव करीत असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी भिवंडी तहसीलदार कार्यलयात येऊन तहसीलदारची भेट घेतली.या भेटी दरम्यान त्यांनी उशीरा जन्म दाखला घेणार्‍या नागरिकांची नोंद तपासणी केली. यामध्ये भिवंडी शहर ग्रामीण भागात एक हजाराहून अधिक बांगलादेश नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. यापैकी शेकडो बांगलादेशी नागरिकांना स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतच्या वतीने जन्म दाखले देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम वस्त्या असलेल्या खोणी, महापोली आणि पडघा, बोरीवली या ग्रामपंचायतीमधील अधिकार्‍यांनी शेकडो बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान बांगलादेशी नागरिकांना पुरावा म्हणून ग्रामपंचायत तर्फे देण्यात आलेले जन्म दाखल्यांची संपूर्ण चौकशी होऊन दोषी अधिकार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. विशेष म्हणजे मालेगाव शहरात बांग्लादेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने एसआयटीकडे तक्रार दिल्याचे ते म्हणाले. त्या पथकानं मालेगावात धाड सत्र सुरु केले आहे.तर महाराष्ट्र राज्यात दोन लाख बांगलादेशी नागरिक वास्तव करीत असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.