HomeमहामुंबईठाणेEknath Shinde : भाजपच्या आमदारांची 'डीपीसी' बैठकीत शिंदेंना प्रश्नांची सरबत्ती, शिवसेना आमदारांची...

Eknath Shinde : भाजपच्या आमदारांची ‘डीपीसी’ बैठकीत शिंदेंना प्रश्नांची सरबत्ती, शिवसेना आमदारांची दांडी, पण सरनाईकांनी…

Subscribe

DPC Meeting Thane : ठाण्याच्या पहिल्याच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदारांनी केला. मात्र...

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपकडून प्रत्येक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी भाजपचे नेते, मंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचं सांगून एकच वात पेटवली आहे. यातच बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक ( डीपीसी ) बुधवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पहिल्याच बैठकीत भाजपच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना निधी आणि समस्यांचा पाढा वाचत प्रश्नांची सरबत्ती करत चक्रव्यूवाहात अडकवण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या होत असलेल्या शाब्दिक हल्ल्यांना त्याच तत्परतेने उत्तर देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उपस्थित नव्हते. मात्र, बैठकीच्या शेवटी मंत्री प्रताप सरनाईक हजर झाले. त्यांनी शिंदेंकडून किल्ला लढवला.

हेही वाचा : दादा, अण्णा अन् ताई पुण्यात चाललंय तरी काय? कुणीही येतं गाड्या फोडून जाते

शिंदेंकडे पालकत्त्व हीच भाजपची खदखद…

ठाणे जिल्ह्यात भाजपचे 9, शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आमदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असूनही ठाणे जिल्ह्याचे पालकत्त्व एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. पालकमंत्रिपद मिळण्यासाठी भाजपचे आमदार आग्रही होते. परंतु, शिंदेंकडे पालकमंत्रिपद गेल्यानं भाजपचे आमदार, नेते, नाराज झाले आहेत.

बुधवारी बैठकीत काय झाले?

बुधवारी पहिल्याच झालेल्या ‘डीपीसी’ बैठकीत भाजपचे किसन कथोरे, रवींद्र चव्हाण, नरेंद्र मेहता, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड या आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आमदार किसन कथोरे यांनी पर्यटनासाठी 10 लाखांचा निधी देत असाल, तर देऊन नका, असा आक्रमक पवित्रा घेतला. विकासाठी निधी वाढवून मिळावा, अशी मागणी

भाजपच्या आमदारांनी लावून धरली.

परंतु, राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा आहे. त्यामुळे थोडे सबुरीने घ्या, असा सल्ला एकनाथ शिंदे आमदारांना दिला. पण, विकासकामांसाठी निधी आवश्यक आहे. तो मिळण्यासाठी भाजपचे आमदार अडून बसले. शेवटी शासनस्तरावर बैठक घेऊन वाढीव निधीचा विचार केला जाईल, असा विश्वास शिंदेंना आमदारांना द्यावा लागला.
एकीकडे भाजपच्या आमदारांकडून पालकमंत्र्यांना प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उत्तरे देण्यात किंवा कुरघोडी करण्यात कमी पडले. शिंदेंच्या शिवसेनेचे तीन आमदार बैठकीला हजेर नव्हते. मात्र, बैठक संपत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हजर झाले. सरनाईक यांनी भाजप आमदारांना उत्तरे दिली.

हेही वाचा : अक्षय शिंदेला नराधम म्हणणे अन् त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणे अंगलट येणार? शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना नोटीस