HomeमहामुंबईठाणेDombiwali : तिसर्‍या मजल्यावरून पडलेल्या चिमुकल्याला झेलले

Dombiwali : तिसर्‍या मजल्यावरून पडलेल्या चिमुकल्याला झेलले

Subscribe

सुदैवाने किरकोळ दुखापतीवर निभावले

डोंबिवली । डोंबिवली येथील एका तेरा मजली इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून दोन वर्षीय बालकाचा हात निसटून तो जमिनीवर पडत असताना भावेश म्हात्रे हा तरुण देवाच्या रुपाने धावत आला. त्याने या लहानग्याला झेलले परंतु तो निसटला मात्र त्यामुळे बालक जमिनीवर आदळले नाही आणि किरकोळ दुखापतीवर हा बाका प्रसंग निभावला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

डोंबिवली पूर्वेतील देवीचापाडा परिसरात अनुराज हाईट्स नावाची १३ मजली इमारत आहे. शनिवारी दुपारी या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून दोन वर्षांचा मुलगा खेळताना दुसर्‍या मजल्यावर पडला. तेव्हा अचानक भावेश महात्रे नावाच्या तरुणाची नजर त्या मुलाकडे गेली. त्याने मुलाला पकडण्यासाठी हात पुढे केला पण तो मुलगा त्याच्या हातातून निसटला आणि जमिनीवर पडला. येथे चांगली गोष्ट म्हणजे मुलाला फारशी दुखापत झाली नाही, हे संपूर्ण दृश्य इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. जिवाची पर्वा न करता मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या देवदूत भावेश म्हात्रेचे जोरदार कौतुक होत आहे.