Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेDombiwali : त्या २७ गावांना पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी

Dombiwali : त्या २७ गावांना पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त २५० कोटींची मागणी

Subscribe

खासदारांची नगरविकास प्रधान सचिवांसमवेत बैठक

डोंबिवली । कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला अधिक गती देण्यासाठी आणि काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी वाढीव २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासमवेत शुक्रवारी मंत्रालयात बैठक पार पडली.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे २७ गावांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. यानंतर येथील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचा देखील महापालिकेत समावेश करत त्यांना मोठा दिलासा देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता २७ गावांतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागावा यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २७ गावातील नागरिकांना घरोघरी मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेची कामे अधिक जलदगतीने व्हावी यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाकडे २५० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी केली. याबाबत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या समवेत मंत्रालयात आढवा बैठक पार पडली. याबैठकी दरम्यान पाणी पुरवठा योजना जलदगतीने राबविण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली.