Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईठाणेहोळी खेळताना डोंबिवलीत तरुणाला मारहाण

होळी खेळताना डोंबिवलीत तरुणाला मारहाण

Subscribe

कल्याण । डोंबिवली जवळील सागाव येथील चेरानगर मध्ये रविवारी रात्री होळीचा रंगोत्सव खेळत असताना एका रहिवाशाने एका तरूणाला बेदम मारहाण केली. तसेच, तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले.
विशाल बब्बू कनोजिया (20) असे तरूणाचे नाव आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तो देसलेपाडा मानपाडा रस्ता भागात राहतो. विशालला सागाव मधील चेरानगर येथील रविकिरण सोसायटीत राहणारे बळीराम सिताराम माळी (45) यांनी मारहाण केली आहे. माळी हे भारत इंग्लिश शाळा भागात राहतात. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार विद्यार्थी विशाल हा रविवारी रात्री होळी साजरी करण्यासाठी मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. विविध सोसायटी, रस्त्यांवरील होळ्यांना भेटी देत, रंगोत्सव, मौजमजा करत फिरत असताना विशाल मित्रांसह चेरानगर रविकिरण सोसायटी भागात आला. त्यावेळी विशाल आणि त्याचे मित्र मौजमजा करत होते.
ही मौज सुरू असताना अचानक आरोपी बळीराम माळी हे पुढे आले. त्यांनी विशालला तू आमच्या घरावर दगड का फेकला, असा प्रश्न केला. आपण दगड कुठेही फेकलेला नाही, असे सांगुनही आरोपी बळीराम यांनी विशालचे काही ऐकले नाही. माळी यांनी विशालला मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड जोराने दगड मारला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पालवे तपास करत आहेत.