Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेKalyan : RTE : आरटीईविषयी प्रलोभनांना बळी पडू नये

Kalyan : RTE : आरटीईविषयी प्रलोभनांना बळी पडू नये

Subscribe

आरक्षित जागांवर मोफत ऑनलाईन प्रवेश

कल्याण । बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश वंचित आणि दुर्बल घटकातील मुला मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत लॉटरी पध्दतीने सोडत काढून प्रवेश पात्र लाभार्थी आणि प्रतिक्षाधिन लाभार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही.

यावरून पालकांना बालकांच्या प्रवेशा संदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचेमार्फत करण्यात येत आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रशासन अधिकारी मनपा/नपा, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे (depmh२@gmail.com), आयुक्त (शिक्षण), पुणे ([email protected])यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविण्यात यावी आणि असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार फौजदार स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.