कल्याण ।आखाती देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. यंदा ‘शिव जयंती फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र’ या महोत्सवाचे ७ वे वर्ष असून, हा भव्य सोहळा रविवारी बीएपीएस हिंदू मंदिर, अबू धाबी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रतापराव जाधव (मंत्री, आयुष स्वतंत्र प्रभार, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार) यांनी भूषविले. कार्यक्रमाला युवराज मालोजीराजे शाहू छत्रपती (छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज, कोल्हापूर) आणि बजरंग सोनावणे (खासदार, भारत सरकार), रवी काळे, किरण राठोड, उमेश नलगे पाटील, प्रदीप आघाव, अमोल दुबे पाटील, पराग चावडा, प्रदीप जेठवा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी मान्यवरांनी सर्व शिवभक्तांसोबत मार्गदर्शन पर संवाद साधला व आयोजक व सर्व सहकारी यांचे कौतुक केले.
तसेच, रायगड भूषण ह.भ.प. रामदास महाराज पाटील (शिवव्याख्याते रायगड) हे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्वांना भक्तिमार्ग आणि शिवराय यांचा भक्ती शक्ती संगम समजावून सांगितला. या वेळी सर्व मान्यवरांनी बीएपीएस हिंदू मंदिर येथे दर्शन घेतले व मंदिराचे प्रमुख स्वामी ब्रह्मविहारीदास यांच्या तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार व कौतुक करण्यात आले. अबू धाबी येथील हिंदू मंदिरात भव्य शिवजयंती उत्सव साजरा झाला हि जगभरातील शिवप्रेमी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमात श्रीमंत ढोल ताशा पथक, दुबई यांचे विशेष सादरीकरण झाले. श्रीमंत ढोल ताशा पथक दुबईचे वादन हा एक अभूतपूर्व अनुभव सगळ्या जगाने बीएपीएस मंदिर अबुधाबी येथे अनुभवला. आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला महाराष्ट्राच्या दैदिपयमान ईतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणार्या ईन्स्पायर इव्हेंट्स युएई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्राची लोककला पोवाडा,भारुड,लेझीम यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात आले. या कार्यक्रमास विविध उद्योजक व समाजसेवी संघटनांनी सहकार्य केले व सागर जाधव (एस.जे.लाईव ) यांनी हा कार्यक्रम टीम च्या सहकार्याने जगातील सर्व शिवप्रेमीं पर्यंत ऑनलाईन लाईव माध्यमातून पोहोचवला.