Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेGudi Padwa 2024 : नववर्ष, गुढीपाडवा स्वागतासाठी ठाण्यातील बाजारपेठा फुलल्या

Gudi Padwa 2024 : नववर्ष, गुढीपाडवा स्वागतासाठी ठाण्यातील बाजारपेठा फुलल्या

Subscribe

चैत्र महिन्यातील पहिला सण

ठाणे । मराठी महिन्यांप्रमाणे चैत्र महिन्यातील पहिला सण गुढीपाडवा राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्साही आहेत. गुढीपाडव्याकरता लागणारे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील स्थानिक परिसर, जांभळी नाका, राममारुती रोड, गोखले रोड येथील बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारी बाजारपेठेत गर्दी केली होती. गुढीपाडवा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. गुढीपाडव्यासाठी आवश्यक चाफा, कडुलिंबाची पाने, वस्त्र, साखरगाठी हार बाजारात दाखल आहेत.

गुढी उभारत असताना लागणारी चाफ्याची फुले आणि कडुलिंबाच्या पाने ही ठाण्यातील फुलांच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह आहे. बाजारातून फुले पाने खरेदी करण्यासाठी ग्राहक ठाण्याच्या स्टेशनजवळील फूल बाजारात गर्दी करत होते. त्याबरोबरच गुढीपाडव्यानिमित्त लागणारे किराणा साहित्य घेण्याकरता ग्राहकांनी गर्दी केली होती. साखर गाठी गोडवा आणि मधुरतेचे प्रतिक आहे. पिवळ्या, गुलाबी, हिरव्या, निळ्या अशा विविध रंगामध्ये साखरगाठी हार उपल्बध आहेत.

हेही वाचा… Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव थेट 71 हजारांवर; चांदीही महागली

या सर्व साहित्याच्या खरेदीकरिता ग्राहक अधिक पसंती देत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. गुढी उभारताना त्याला लावले जाणारे वस्त्र हे रेडीमेड स्वरुपात उपलब्ध आहेत. पैठणी, जरी काठ, खण अशा विविध प्रकारची वस्त्रे बाजारात उपलब्ध आहेत. गुढीकरता काठाची रेडिमेड साडी खरेदी करण्याकडे महिलांचा अधिक कल आहे.

शंभर रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत किंमत असणार्‍या गुढ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा पाच टक्क्यांनी गुढींच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे रेडिमेड गुढी विदेशात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवल्या गेल्या आहेत. – विजया राणे, विक्रेता, ठाणे

हेही वाचा…Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला श्रीखंड का खाल्ले जाते? जाणून घ्या श्रीखंडाचा इतिहास