Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : Amol Mitkari : CKP : राम गणेश गडकरी यांची बदनामी सहन करणार नाही

Thane : Amol Mitkari : CKP : राम गणेश गडकरी यांची बदनामी सहन करणार नाही

Subscribe

ठाण्यात सीकेपी समुदाय ठाण्यात आक्रमक, अमोल मिटकरींवर कारवाईची मागणी

ठाणे । भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात मंगळवारी तीव्र निदर्शने करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला. यावेळी सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळे फासले आणि मिटकरींवर कारवाईची मागणी केली.
ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर आंदोलनकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले तसेच जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांतर्फे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी याप्रसंगी दिला. राजसन्यास नाटक त्यातील घटना आणि प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले. गडकरी यांच्या पूर्वी प्रत्येक लेखक, नाटककार आदींनी छत्रपती संभाजी महाराजांचे
कसे विकृत चित्र रंगविले आणि राम गणेशांनी लढवय्ये संभाजी महाराज कसे दाखविले याची माहिती दिली.

अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यात व तालुकास्तरावर निदर्शने व निवेदने देण्यात येणार असल्याचे याप्रसंगी समीर गुप्ते यांनी जाहीर केले. या आंदोलनात मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते, तुषार राजे, रामानंद सुळे अतुल फणसे, गिरीश राजे विकास देशमुख , जयदीप कोरडे, राजीव प्रधान , विनय चौबळ, शिरीष गडकरी, दीपक फणसे, नागेश कुळकर्णी, यशवंत रणदिवे, चंद्रशेखर देशपांडे, किशोर राजे, नितीन वैद्य, प्रकाश दिघे, तेजस राजे, राधिका गुप्ते योगिनी चौबळ, पूजा सुळे यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.