ठाणे । ठाणे पोलीस उपायुक्त, सह पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस राहुल म्हस्के यांनी विशेष मोहीम राबविली होती. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळालेल्या माहितीनुसार २६ जानेवारीला रात्री हॅप्पी व्हॅली सर्कल जवळ मानपाडा ठाणे येथे आरोपी मोईन मोहमद आरिफ निर्बाण (२९) आणि मोहंमद नागोरी (२७) हे दोघे दुचाकीवरून एमडी हा अंमली पदार्थ घेऊन येणार होते. हा अंमली पदार्थ एमडीची पावडर त्यांनी विक्रीसाठी आणली होती. त्यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्यावर चितलसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या दोघांना पाच फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Thane : Crime : ठाण्यातील मानपाड्यातून अमली पदार्थ ‘एमडी’ जप्त
written By Sanjay Sonawane
Thane