HomeमहामुंबईठाणेThane : जीबीएस आजाराला घाबरू नका, काळजी घ्या

Thane : जीबीएस आजाराला घाबरू नका, काळजी घ्या

Subscribe

भिवंडी महापालिकेचे आवाहन

ठाणे । पुणे येथे जिबीएस या आजाराचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. या आजारास घाबरुन जाण्याचे कारण नाही. आजारामध्ये बाधीत रुग्णांची मज्जातंतूवर आघात झाल्याने हा आजार संभवतो. या आजाराची लागण सर्वसाधारणतः सर्व वयोगटातील व्यक्तींना होतो. या आजाराचे अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येतात. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आजाराबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करुन कोणत्याही अफवाना बळी पडू नये आणि या आजारा संदर्भात शंका आल्यास त्वरीत आपले जवळचे नागरी आरोग्य केंद्र आणि शासनाचे रुग्णालयाशी संपर्क साधावा. असे सहकार्य करण्याचे आवाहन भिवंडी महानगरपालिका आयुक्त, वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

अशी काळजी घ्या
पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून गाळून प्यावे, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा. मांस असल्यास पूर्ण शिजलेले असेल याची खात्री करणे. शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
हातापायातील ताकद कमी होणे, लकवाची लक्षणे दिसून येणे, हातापायाला मुंग्या येणे, अन्न गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे. तसेच जास्त दिवसांचा डायरीया होणे.