Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईठाणेThane : जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

Thane : जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

Subscribe

ठाणे । शेतकरी आणि पशुपालक यांनी प्रेरणा घेऊन पशुपालन उद्योग, शेती व्यवसायाबरोबरच शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत ’जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन’ शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ९ वा. आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव, भिवंडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील पशुपालकांनी जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी केले आहे. या प्रदर्शनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रादेशिक सहायुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. वल्लभ जोशी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.

या प्रदर्शनास लोकसभा सदस्य डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, लोकसभा सदस्य बाळ्यामामा-सुरेश गोपीनाथ म्हात्रे, लोकसभा सदस्य नरेश गणपत म्हस्के, विधानसभा सदस्य ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, विधानसभा सदस्य रविंद्र दत्तात्रय चव्हाण, विधानसभा सदस्य दौलत भिका दरोडा, विधानसभा सदस्य संजय मुकुंद केळकर, विधानसभा सदस्य कुमार उत्तमचंद आयलानी, विधानसभा सदस्य महेश प्रभाकर चौगुले, विधानसभा सदस्य विश्वनाथ आत्माराम भोईर, विधानसभा सदस्य राजेश गोवर्धन मोरे, विधानसभा सदस्य निरंजन वसंत डावखरे, विधानसभा सदस्य डॉ. जितेंद्र सतिश आव्हाड, विधानसभा सदस्य किसान शंकर कथोरे, विधानसभा सदस्य मंदा विजय म्हात्रे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर, विधानसभा सदस्य शांताराम तुकाराम मोरे, विधानसभा सदस्य नरेंद्र मेहता, विधानसभा सदस्य रईस कासम शेख, विधानसभा सदस्य सुलभा गणपत गायकवाड या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शन संपन्न होणार आहे.

या प्रदर्शनात पशुधनांचे स्टॉल ६०, इतर स्टॉल १५ असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात येणार आहे. प्रदर्शनात जात निहाय पशुधन १००, पक्षी ६० पाहण्यासाठी उपलब्ध असतील. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मदतीने शौचालय (मोबाईल टॉयलेट), अग्निशामक पथक, आरोग्य विभागामार्फत आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत विभागामार्फत सफाई कामगारांमार्फत सफाई व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. समीर तोडणकर यांनी दिली.