Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहामुंबईठाणेठाणे वाहतूक पोलिसांनी 173 तळीरामांची उतरवली झिंग

ठाणे वाहतूक पोलिसांनी 173 तळीरामांची उतरवली झिंग

Subscribe

ठाणे । धुलीवंदनाच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍या 173 तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभरात कारवाई केली. तब्बल एक हजार 542 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवरही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.

होळी तसेच धुलीवंदनाच्या नावाखाली मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍या चालकांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेने संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 24 आणि 25 मार्च अशी दोन दिवस नाकाबंदी करुन कारवाईची मोहीम सुरु केली. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील 18 युनिटमध्ये सुमारे 500 अधिकारी कर्मचारी यांच्या चमूने 40 ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे मुख्य नाक्यांवर तपासणी केली. याच तपासणीमध्ये मोटार वाहन कायद्याखाली ड्रंक अँड ड्राइव्हचे 173 खटले दाखल करण्यात आले. दुचाकीवर ट्रीपल सीट प्रवास करणार्‍या 663 चालकांवर कारवाई झाली. तर विना हेलमेट दुचाकी चालविणार्‍या एक हजार 542 चालकांंसह जादा प्रवासी नेणार्‍या 365 रिक्षा चालकांवर सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.