उल्हासनगर । बस निवारे निश्चित जागेवरच उभारले जावेत, तसेच बस निवार्यावर अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर लावणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सूचना मनपा आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत संबंधित अधिकर्यांना दिल्या. १२ मीटर लांबीच्या वातानुकूलित बसेस शहरातच न चालवता ही बससेवा शहाड ते टिटवाळा स्टेशनपर्यंत चालवण्यात यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.
उल्हासनगर महानगर पालिकेने स्वतः ची परिवहन सेवा सुरु केली आहे. या परिवहन सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मनपा आयुक्तांनी परिवहन विभागाच्या कामकाजचा आढावा घेतला. शहरातील बस निवारे आणि दिव्यांग, महिला, वृद्धांसमवेत अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा उपस्थित केला. महापालिका आयुक्तांनी परिवहन सेवेच्या अधिकार्यांना बजावताना सांगितले कि बस निवारे निश्चित जागेवरच नियमानुसार उभारणे, प्रवाशी निवारे उभारले असेल तर पुन्हा दुसर्या जागी बस निवारे हलवण्यात येऊ नये, बस निवार्यावर अनधिकृत होर्डिंग असतील तर ताबडतोब काढण्यात यावे, होर्डिंग लावणार्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा सध्या शहरात रस्त्यांचे कामांमुळे खोदकाम सुरु आहे. त्यामुळे मीटर लांबीच्या वातानुकूलित बसेसमुळे वाहतूक कोंडीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बसेस टिटवाळा स्टेशनपर्यंत चालवण्यात याव्यात, दिव्यांग महिला आणि वृद्धांना सवलत देण्याबाबतीत प्रस्ताव तयार करण्याच्या मनपा आयुक्त आव्हाळे यांनी परिवहन विभागाला सूचना दिल्या.