Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईAttack on Marathi Man : मराठी माणसावर पुन्हा हल्ला, परप्रांतीय महिलांकडून शिवीगाळ करत मारहाण

Attack on Marathi Man : मराठी माणसावर पुन्हा हल्ला, परप्रांतीय महिलांकडून शिवीगाळ करत मारहाण

Subscribe

कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी कुटुंबावर काही परप्रांतीय गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर सांताक्रूझमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता जुहू परिसरात भरदिवसा परप्रांतीय महिलांनी मराठी माणसावर हल्ला केल्याची घटना समोर येत आहे.

मुंबई : कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी मराठी कुटुंबावर काही परप्रांतीय गुंडांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर सांताक्रूझमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता जुहू परिसरात भरदिवसा परप्रांतीय महिलांनी मराठी माणसावर हल्ला केल्याची घटना समोर येत आहे. जुहू लोटस आय हॉस्पिटलसमोर असलेल्या गॉड गिफ्ट वसाहतीत परप्रांतीय तीन बहिणींनी मिळून एका मराठी माणसाला शिवीगाळ करत मारहाण केली. धक्कादायक म्हणजे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोपा तेथील रहिवाश्यांनी केला आहे. (Three migrant sisters attack Marathi man in God Gift colony in Juhu area)

मिळालेल्या माहितीनुसार, गॉड गिफ्ट वसाहतीत राहणाऱ्या परप्रांतीय पांडे नावाच्या तीन बहिणींनी मराठी माणसाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. शिवीगाळ आणि मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डिंपल पांडे आणि तिच्या दोन बहिणी शेजाऱ्यांना नेहमीच त्रास देत असल्याची माहिती समोर येत आहे. या तिघींविरोधात स्थानिक नागरिकांनी या आधीही जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे या बहिणींचे वर्तन अधिकच उग्र होत चालले आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा – Pawar Vs Mahayuti : सरकार उत्तर देईल का? नंबर प्लेटबाबत रोहित पवार यांचा थेट सवाल

आताही तिघी बहिणींनी मराठी माणसाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हल्ला झाल्यानंतर संबंधित नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली. परंतु तिन्ही बहिणींवर पोलिसांकडून कोणतीही तत्काळ कारवाई झाली नाही. रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलीस या प्रकरणात दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हिडीओमध्ये दिसते की, मराठी माणूस गॉड गिफ्ट वसाहतीत आपल्या दुचाकीवर येतो. त्यानंतर एक तरुणी मराठी माणसाच्या समोर येते आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात करते. त्यानंतर ती तिथे बाजूलाच पडलेला लाकडी तुकडा उचलते आणि मराठी माणसाच्या मानेवर मारते. यावेळी तिची बहीण सदर घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करताना दिसते. त्यानंतर मराठी माणूस परप्रांतीय बहिणींना मारायला धावतो. यावेळी परिसरातील इतर नागरिक मराठी माणसाला पकडतात. तेव्हाही परप्रांतीय बहिणी मराठी माणसाला शिवीगाळ करताना दिसत आहेत.

हेही वाचा – Thackeray Vs RSS : संघाची लोक कुंपणावर बसून टीकाटिपण्या करतात, ठाकरेंचा घणाघात