Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईUlhasnagar : फोन करूनही सरकारी रुग्णवाहिका न पोहोचल्याने रुग्णाचा मृत्यू, उल्हासनगरच्या त्या डॉक्टरचे निलंबन

Ulhasnagar : फोन करूनही सरकारी रुग्णवाहिका न पोहोचल्याने रुग्णाचा मृत्यू, उल्हासनगरच्या त्या डॉक्टरचे निलंबन

Subscribe

मुंबई : काही दिवसांपूर्वी म्हणजेच 23 जानेवारीला अत्यवस्थ रुग्णाला 108 नंबरची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडल्याचे समोर आले होते. हा मुद्दा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशानामध्ये उचलण्यात आला. विधानसभेत तारांकित प्रश्न उचलण्यात आल्यानंतर आरोग्य विभागाने रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांच्यासह दोन डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे. यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार, अत्यवस्थ असलेल्या रुग्णासाठी घेऊन जाणाऱ्या सरकारी रुग्णवाहिकेला फोन करूनही तब्बल सहा तास उलटले तरीही रुग्णवाहिका आली नाही. यावेळी चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. (Ulhasnagar district surgeon suspended after ambulance did not arrive)

हेही वाचा : Eknath Shinde : काळू धरण पूर्ण करून ठाण्याची पाणी समस्या निकाली काढणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन 

उल्हासनगरमधील कॅम्प नं 1 येथील 35 वर्षीय राहुल इंदाले यांची तब्येत बिघडल्याने मध्यवर्ती रुग्णालयात भरती केले होते. 23 जानेवारीला गुरुवारी दुपारी 3 वाजता त्याची तब्येत बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. त्यासाठी 108 नंबरवरील ऍम्ब्युलन्सला फोन केला. पण दोन तास ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार नाही, असे रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. यावेळी दुसरी ऍम्ब्युलन्स रुग्णाला उपलब्ध करून दिली नाही. तर दुसरीकडे रुग्णाची तब्येत बिघडत होती. नातेवाईकानी रुग्णालयाची किंवा खाजगी ऍम्ब्युलन्स बोलावण्याची विनंती डॉक्टर आणि नर्सला केल्यानंतरही रुग्णवाहीका उपलब्ध करून दिली नाही. रात्री 8 वाजेपर्यंत ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

राहुल यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि नर्स यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल यांच्या कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिकेने आम्ही त्यांना घून जातो, असे सांगितले असताना त्यांनी परवानगी नाकारली. तसेच यावेळी राहुल यांना डिस्चार्जही न दिल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कर्तव्यावर असलेल्या ३ डॉक्टरांना मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्याची दखल घेत आरोग्य सेवा आयुक्तालयाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन केले.