Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
HomeमहामुंबईVOICE OF BSF : राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेचा समारोप 4-5 मार्चला दादरला

VOICE OF BSF : राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेचा समारोप 4-5 मार्चला दादरला

Subscribe

यावर्षी 1 जानेवारी ते 5 मार्च या प्रदीर्घ कालावधीत VOICE OF BSF स्पर्धेच्या पहिल्या भागात ऑनलाइन पद्धतीने 134 जवान तसेच अधिकारी यांनी सहभाग दर्शविला. उपांत्य फेरी, अंतिम फेरी, महाअंतिम फेरी, पारितोषिक वितरण सोहळा आणि 'सलामी 2025' याचा समारोप सोहळा 4 आणि 5 मार्च 2025 रोजी मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे कला क्षेत्रातील मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत होणार आहे.

(VOICE OF BSF) मुंबई : सीमा सुरक्षा दलासाठी (BSF) मुक्ता इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.ने VOICE OF BSF ही स्पर्धा आयोजित केली होती. सीमा सुरक्षा दलाच्या जवान तसेच अधिकाऱ्यांकडून याला भरघोस प्रतिसाद मिळाला. याचा समारोप सोहळा 4 आणि 5 मार्च 2025 रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे होणार आहे. (A national level singing competition for jawans and officers)

सीमा सुरक्षा दलासाठी 2015पासून करमणुकीचे कार्यक्रम करीत असताना संतोष परब यांना एक गोष्ट लक्षात आली होती की, इथले जवान आणि अधिकारीसुद्धा ताला-सूरांशी मैत्री ठेऊन आहेत. ही मंडळी खूप चांगले गातात. मग प्रशांत काशिद यांच्या सूचनेनुसार VOICE OF BSF ही राष्ट्रीय स्तरावरील जवानांची तसेच अधिकाऱ्यांची गायन स्पर्धा प्रत्यक्षात उतरली आली. या संकल्पनेला सीमा सुरक्षा दलाच्या दिल्ली मुख्यालयातून परवानगीचा हिरवा कंदील मिळाला. सीमा सुरक्षा दलाच्या 60 वर्षांच्या देदीप्यमान इतिहासात दुसऱ्यांदा होत असलेली ही स्पर्धा जवान आणि अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी ठरली.

राजस्थानमधील जोधपूर, पोखरण, जैसलमेर, ब्रह्मसर, रामगढ, बबलीयनवाला, खाजूवाला, सांचू, बिकानेर सेक्टर या सीमावर्ती भागात ‘सलामी’ करमणुकीचा उपक्रम 1 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांच्या करमणुकीकरिता झालेल्या या कार्यक्रमात 45 कलावंत आणि तंत्रज्ञ सहभागी झाले होते.

तर, यावर्षी 1 जानेवारी ते 5 मार्च या प्रदीर्घ कालावधीत VOICE OF BSF स्पर्धेच्या पहिल्या भागात ऑनलाइन पद्धतीने 134 जवान तसेच अधिकारी यांनी सहभाग दर्शविला. उपांत्य फेरी, अंतिम फेरी, महाअंतिम फेरी, पारितोषिक वितरण सोहळा आणि ‘सलामी 2025’ याचा समारोप सोहळा 4 आणि 5 मार्च 2025 रोजी मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे कला क्षेत्रातील मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेच्या निमित्ताने VOICE OF BSF या दुसऱ्या वर्षीच्या विजेत्यास TVS या बाइक उत्पादक कंपनीने नवी कोरी बाइक भेट म्हणून प्रदान केली आहे. जवान आणि अधिकारी विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. संगीतकार श्रींरंग आरस, मनोहर गोलांबरे, मालिका दिग्दर्शक विवेक देशपांडे, प्रसिद्ध गायिका माधुरी नारकर, प्रदीप कडू, संजयराज गौरीनंदन हे या स्पर्धेचे परीक्षक आहेत. हिंदुस्थानच्या सीमेवर तैनात आणि या स्पर्धेत सहभाग घेणारे 30 पैकी 26 जवान त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत

या दोन्ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी किसन जाधव, नाना आंबोले, अशोक सावंत, बाळा खोपडे, प्रदीप कडू, डॉ. सुनूल हळूरकर, निखिल जाधव, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. शर्मिला जाधव, राजेश खोमणे, मारुती खुळे, संजीव जाधव, रजनीश राणे, सुनील चव्हाण, डॉ. शाम नाबर, डॉ, मांगरीश रांगणेकर, डॉ. अजित चराटकर, डॉ. महेश संघवी, सिद्धार्थ तांबे, सायली परब, सुनील मेहेतर, अनुप सुर्वे, मेघश्याम दिघोळे, ऍड. तुषार काळे, केतन सरगे, जमील सिद्दिकी, कोमल दळवी, उज्वला अबनावे, दीपमाला लादे या मंडळींनी विशेष मेहनत घेतली.

या सोहळ्यास मुंबईतील मान्यवर उद्योजक, कलावंत, आणि ‘सलामी’ संकल्पनेचे हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण उपक्रमास प्रसिद्ध गायिका माधुरी नारकर यांची स्वर्णस्वर एंटरटेनमेंट, प्रिं. अजय कौल यांचा एकता मंच, नितीन नांदगावकर यांची निमना फाऊंडेशन, अविराज पवार यांची शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था यांच्या विशेष सहकार्यातून होत असलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण सोहळ्याची संकल्पना प्रशांत काशीद यांची आहे. संकल्पनेत नावीन्य आणणे, लेखन, दिग्दर्शन, आयोजन तसेच नियोजन संतोष परब यांचे आहे.