घरताज्या घडामोडीअखेर अश्विनी भिडेंना हटवले; मुंबई मेट्रो-३ प्रकल्पावरून बदली!

अखेर अश्विनी भिडेंना हटवले; मुंबई मेट्रो-३ प्रकल्पावरून बदली!

Subscribe

मेट्रो ३ आणि आरेमधील प्रस्तावित कारशेड यांच्यामुळे टीकेच्या केंद्रस्थानी आलेल्या एमएमआरसीएलच्या संचालिका अश्विनी भिडे यांची या पदावरून अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे.

आरेमधील प्रस्तावित मुंबई मेट्रो-३ च्या कारशेडमुळे हा प्रकल्प वादात सापडला होता. पर्यावरणवाद्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून देखील या कारशेडला मोठा विरोध करण्यात आला होता. या सगळ्या वादामध्ये एमएमआरसीच्या संचालिका अश्विनी भिडे या मात्र कारशेडटं समर्थन करत होत्या. त्यामुळेच त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. खुद्द विद्यमान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या कारशेडला विरोध दर्शवला होता. अखेर, या कारशेडचं समर्थन करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडून एमएमआरसीएलचा पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता एमएमआरसीएलच्या संचालक पदावर रणजितसिंग देओल यांची बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले रणजितसिंग देओल आता अश्विनी भिडेंच्या जागी मेट्रो – ३ चा कार्यभार पाहतील. दरम्यान, अश्विनी भिडे यांच्या हातून एमएमआरसीएलचा पदभार काढून घेतल्यानंतर त्यांना अद्याप कोणतीही पोस्टिंग देण्यात आलेली नाही.

एकूण २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, अश्विनी भिडे यांच्यासोबतच इतर २० अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्ये आपल्या कडक शिस्तीमुळे प्रसिद्ध आणि कुप्रसिद्धही असलेले तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहे. तुकाराम मुंढेंची एड्स नियंत्रण प्रकल्पावरून नागपूरचे पालिका आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

वाचा सविस्तर – तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता नागपूरच्या आयुक्तपदाची जबाबदारी!

१) संपदा मेहता यांची विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

२) रणजीससिंग देओल यांची एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

३) एस. एन. गायकवाड यांची साखर विभागाचे आयुक्तपदावरून पुणे महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

४) सौरभ राव यांची पुणे महापालिकेचे आयुक्तपदावरून साखर विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

५) प्राजक्ता लवंगारे यांची बदली मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून करण्यात आली आहे.

६) के. बी. उमप यांच्यावर एक्साईज विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे.

७) आनंद रायते यांच्यावर अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त म्हणून पदभार सोपवला आहे.

८) ए. एम. कवाडे यांच्यावर सहकारी संस्था विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

९) आर. आर. जाधव यांच्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

१०) ओमप्रकाश देशमुख यांची मुद्रांकशुल्क विभागात बदली करण्यात आली आहे.

११) वळसा नायर यांच्यावर पर्यटन विभागाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

१२) एस. एस. डुंबरे यांच्यावर MEDAच्या डीजी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

१३) पराग जैन यांची सामाजिक न्याय विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

१४) दिनेश वाघमारे यांच्यावर विद्युत पारेषण विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

१५) आयुष प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.

१६) अरविंद कुमार यांची एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक पदावरून जलसंवर्धन, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

१७) एस. आर. जोंधळे यांची मुंबई शहर जिल्हाधिकारी पदावरून जीएडीचे सचिव म्हणून बदली झाली आहे.

१८) आर. डी. निवतकर यांची सहायक सचिव पदावरून मुंबई शहरचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

१९) यु. ए. जाधव यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

२०) किरण पाटील यांची कृषी विभागाचे उप सचिव पदावरून मुख्य सचिव कार्यालयामध्ये उपसचिव पदावर बदली झाली आहे.

२१) तुकाराम मुंढे यांची नागपूरचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -