घरमहा @२८८मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६२

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६२

Subscribe

मालाड पश्चिम (विधानसभा क्र. १६२) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात जरी गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा वरचष्मा राहिला असला, तरी मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चित्र वेगळं आहे. मुस्लीम बहुल भाग असल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस आपलं वर्चस्व राखून आहे. २०१४मध्ये देखील इतर सर्व मतदारसंघांमध्ये भाजप किंवा शिवसेनेचा जोर असताना या एकमेव मतदारसंघात काँग्रेसनं मोठ्या फरकानं विजय मिळवला आहे. या मतदारसंघामध्ये एकूण २८८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,६३,६९७
महिला – १,३९,३८२

- Advertisement -

एकूण मतदार – ३,०३,०८३


Aslam Shaikh
अस्लम शेख

विद्यमान आमदार – अस्लम शेख

अस्लम शेख यांनी गेल्या १५ ते २० वर्षांपासून या मतदारसंघावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. २००२ ते २०१२मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक होते. २००९मध्ये याच मतदारसंघातून त्यांनी विधानसभा गाठली होती. २०१४मध्ये देखील इथल्या मतदारांनी त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला. यंदा मात्र सचिन अहिर यांच्याप्रमाणेच अस्लम शेख हे देखील त्यांच्या पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेची वाट धरणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अस्लम शेख, काँग्रेस – ५६,५७४
२) राम बरोत, भाजप – ५४,२७१
३) विनय जैन, शिवसेना – १७,८८८
४) दीपक पवार, मनसे – १४,४२५
५) सीरील डिसोझा, अपक्ष – १३६३

नोटा – १७१४

मतदानाची टक्केवारी – ५०.०७ %


हेही वाचा – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -