घरमहा @२८८पुसद विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८१

पुसद विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८१

Subscribe

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद (विधानसभा क्र. ८१) विधानसभा मतदारसंघ आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. पुसद मतदारसंघाचे नाव घेतले तर डोळ्यासमोर येतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक. पुसदने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले. पुसद म्हणजे नाईक घराणे असे समीकरणच राज्यात तयार झाले आहे. त्यांच्याच घरातील मनोहर नाईक हे सध्या पुसदचे आमदार आहेत. मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर अलीकडे मनोहर नाईक यांच्याकडे मंत्रीपद असूनही पुसदचा फारसा विकास झालेला नाही.

आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघात तांडा वस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था, सूतगिरण्या बंद झाल्यामुळे रोजगाराचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. नाईकांना इथे दैवत मानले जात असल्यामुळे त्यांना राजकीय प्रतिस्पर्धी निर्माण झालेला नाही. २०१४ साली राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते पराभूत झाले, मात्र पुसदमध्ये नाईकांनी आपला गड राखला होता.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ८१

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,४८,७४२
महिला – १,३२,८६७

एकूण मतदार – २,८१,६१०

विद्यमान आमदार – मनोहर नाईक, राष्ट्रवादी

पुसद मतदारसंघात मागच्या ७० वर्षांपासून नाईक घराण्याची पकड आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्यानंतर मनोहर नाईक यांनी मागचे २० वर्ष मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. मनोहर नाईक हे कमी बोलणारे म्हणजेच मितभाषी नेते म्हणून मानले जातात. २०१४ साली मोदी लाटेत निवडून येण्याची किमया त्यांनी करून दाखवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी विविध खात्यचे मंत्रिपदही भूषविले होते. पुसद नगरपालिका असो किंवा जिल्ह्याचे स्थानिक राजकारण.. पुसदमध्ये नाईक घराण्याला वगळून पुढे जाता येत नाही.

मात्र सध्या नाईक घराण्यात चलबिचल पाहायला मिळत आहे. मनोहर नाईक यांचे कनिष्ठ पूत्र इंद्रनील नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अद्याप त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसला तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.

pusad mla manohar naik
पुसद मतदारसंघाचे आमदार मनोहर नाईक

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मनोहर नाईक, राष्ट्रवादी – ९४,१५२
२) प्रकाशराव देसरकर, शिवसेना – २८,७०७
३) वसंतराव पाटील, भाजप – १९,०८८
४) सचिन नाईक, काँग्रेस – १४,९७४
५) विशालभाऊ जाधव, अपक्ष – ५५२६

 


हे वाचा – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -