Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Maharashtra Election 2024 : मतदारांमध्ये निरुत्साह! राज्यात 62.05 टक्के मतदान

Maharashtra Election 2024 : मतदारांमध्ये निरुत्साह! राज्यात 62.05 टक्के मतदान

Subscribe

पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 62.05 टक्के मतदानाची नोंद झाली असून मतदानाचा हा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या निवडणुकीत 67.19 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तेचा गड सर करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर पक्षात गेले काही दिवस चाललेल्या निर्णायक आणि चुरशीच्या राजकीय लढाईचा शेवट आज, बुधवारी (20 नोव्हेंबर) झाला. मराठा-धनगर आरक्षण, धारावी पुनर्विकास, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालाला हमीभाव, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्रातून हिरावले जाणारे उद्योग, लाडकी बहीण, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है  आदी मुद्द्यांवर गाजलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा पुढील पाच वर्षासाठी कारभारी कोण असेल याचा फैसला राज्यातील मतदारांनी आज केला. (62.05 percent voter turnout in Maharashtra Assembly Elections 2024)

पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 62.05 टक्के मतदानाची नोंद झाली असून मतदानाचा हा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या निवडणुकीत 67.19 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. दरम्यान, राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्वपक्षीय दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे राज्यातील मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला याची उत्सुकता ताणली गेली असून आता सर्वांना नजरा 23 नोव्हेंबरच्या मतमोजणीची आणि निकालाकडे लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : जरांगे फॅक्टरचा फटका भाजपाला बसणार! एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी

अहमदनगर – 61.95 टक्के
अकोला – 56.16 टक्के
अमरावती – 58.48 टक्के
औरंगाबाद – 60.83 टक्के
बीड – 60.62 टक्के
भंडारा – 65.88 टक्के
बुलढाणा – 62.84 टक्के
चंद्रपूर – 64.48 टक्के
धुळे – 59.75 टक्के
गडचिरोली – 69.63 टक्के
गोंदिया – 65.09 टक्के
हिंगोली – 61.18 टक्के
जळगाव – 54.69 टक्के
जालना – 64.14 टक्के
कोल्हापूर – 67.97 टक्के
लातूर – 61.43 टक्के
मुंबई शहर – 49.07 टक्के
मुंबई उपनगर – 51.76 टक्के
नागपूर – 56.06 टक्के
नांदेड – 55.88 टक्के
नंदुरबार – 63.72 टक्के
नाशिक – 59.85 टक्के
उस्मानाबाद – 58.59 टक्के
पालघर – 59.31 टक्के
परभणी – 62.73 टक्के
पुणे – 54.09 टक्के
रायगड – 61.01 टक्के
रत्नागिरी – 60.35 टक्के
सांगली – 63.28 टक्के
सातारा – 64.16 टक्के
सिंधुदुर्ग – 62.06 टक्के
सोलापूर – 57.09 टक्के
ठाणे – 49.76 टक्के
वर्धा – 63.50 टक्के
वाशिम – 57.42 टक्के
यवतमाळ – 61.22 टक्के

- Advertisement -

हेही वाचा – CM Shinde meet Worli Voters : एकनाथ शिंदेंची वरळीत अचानक भेट; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात काय होणार?


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -