Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Maharashtra Election 2024 : काँग्रेस उमेदवाराचा प्रचार नागरिकांच्या जीवावर; 9 वर्षाचा मुलगा...

Maharashtra Election 2024 : काँग्रेस उमेदवाराचा प्रचार नागरिकांच्या जीवावर; 9 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

Subscribe

महाविकास आघाडीच्या धारावी विधानसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी कनैह्या कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. मात्र रेवंत रेड्डी यांच्या प्रचार रॅलीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली.

मुंबई : महायुतीच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात येत आहेत. तर महाविकास आघाडीच्या प्रचाराला काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांची बहीण प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीच्या धारावी विधानसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी कनैह्या कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. मात्र रेवंत रेड्डी यांच्या प्रचार रॅलीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. (A 9-year-old boy was seriously injured due to firecrackers burst during Dr Jyoti Gaikwad campaign rally)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचार रॅलींचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.याचाच प्रत्यय मुंबईत आला. काँग्रेसच्या प्रचार रॅलीदरम्यान झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे एक लहान मुलगा जखमी झाला. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : जाहीर सभेत शरद पवारांनी महिला मुख्यमंत्रीपदाबाबत केले मोठे वक्तव्य

काय घडले नेमकं?

मुंबईतील धारावीत 13 नोव्हेंबर रोजी अशीच दुर्दैवी घटना घडली. काँग्रेसचे उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी धारावीमधील कामराज नगर येथे मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला फटाक्यांच्या स्फोटामुळे गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलाला सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला

दरम्यान, वर्षा गायकवाड यांना लोकसभेत पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्या दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यामुळे आता या मतदारसंघातून त्यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योती गायकवाड या याआधी राजकारणात सक्रीय असल्याच्या दिसल्या नाही. मात्र वर्षा गायकवाड खासदार झाल्यानंतर त्या अचानक स्थानिक पातळीवर काम करताना पाहायला मिळाल्या. ज्यामुळे पक्षाकडून पुन्हा एकदा धारावी विधानसभेतील घराणेशाही कायम ठेवत ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देऊ केली. विशेष म्हणजे धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुनर्विकास प्रकल्पामुळे धारावी चर्चेत आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मतदारर महाविकास आघाडी की महायुतीच्या उमेदवाराला विजयी करतात? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Uddhav Thackeray : माझं सरकार पाडणं हा भाजपाचा सत्ता जिहाद; ठाकरेंचा गंभीर आरोप


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -