Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024MNS : …तेव्हा मी वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले; अमित ठाकरेंनी सांगितला...

MNS : …तेव्हा मी वडिलांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले; अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग

Subscribe

मनसे नेते आणि माहिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान, मनसे अध्यक्ष व त्यांचे वडील राज ठाकरे यांच्याबाबत एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.

मुंबई : विधासभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. तर महायुती आणि महाविकास आघाडी पक्षातील काही ज्येष्ठ आणि प्रमुख नेते वृत्तपत्र, वृत्तसंस्था आणि इतर माध्यमांतून मुलाखती देत आहेत. मनसे नेते आणि माहिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान, मनसे अध्यक्ष व त्यांचे वडील राज ठाकरे यांच्याबाबत एक भावनिक प्रसंग सांगितला आहे. (Amit Thackeray says when he left Shiv Sena he saw tears in Raj Thackeray eyes for the first time)

एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्याचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले की, 2006 मध्ये मी शाळेत होतो. त्यावेळी मला शिवसेना पक्ष वैगरे काहीही माहिती नव्हतं. मी माझं आयुष्य जगत होतो. त्यावेळी फक्त बाळासाहेब हे आजोबा आणि उद्धव ठाकरे हे काका आहेत, एवढंच नातं मला माहिती होतं. एकेदिवशी मी घरातून खाली उतरलो, तेव्हा माझे वडील म्हणजे राज ठाकरे त्यांच्या गाडीतून बाहेर उतरले. त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले, असा भावनिक प्रसंग ठाकरे यांनी सांगितला.

- Advertisement -

अमित ठाकरे म्हणाले की, माझे वडील शिवसेना सोडणार हे मला समजलं होतं. त्यानंतर अनेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या. काहीतरी चुकीचं घडतंय हे जाणवत होतं आणि पुढे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला. त्यानंतर 2009 मध्ये आमच्या पक्षाला मोठं यश मिळालं, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – CM Eknath Shinde : महायुती सरकार पुढचे पाच वर्ष सत्तेत असेल; मुख्यमंत्र्यांना विश्वास

- Advertisement -

मनसेचे नगरसेवक फोडण्याचा किस्सा सांगताना अमित ठाकरे म्हणाले की, 2017 मध्ये मी आजारी असताना शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवक पैसे देऊन फोडले. आज ते लोक दुसऱ्यांना खोके घेतले म्हणतात, पण त्यांनीही तेव्हा खोके देऊन नगरसेवक फोडले. मी आजारी असताना हे सर्व घडलं होतं, त्यामुळे मला ही गोष्ट पटली नाही. तेव्हा हे लोक कसे आहेत, हे कळलं. खरं तर त्यांनी पाठिंबा मागितला असता, तर राज ठाकरेंनी दिला असता, पण शिवसेनेने नगरसेवक फोडले. त्यामुळे त्यावेळी राज ठाकरेंना काय वाटलं असेल, याचा विचार कुणीही करत नाही, अशी खंतही अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.

माहिम मतदारसंघात तिहेरी लढत

दरम्यान, माहिम मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिहेरी लढत होत आहे. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी महायुतीकडून होत होती. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र शेवटच्या दिवशी थोडं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही काळ आधी सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारल्यानंतर सदा सरवणकर हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा – Shiv Sena Pramukh : विचारधारेशी समर्पण आणि तत्वांशी कटिबद्धता… अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -