Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Maharashtra Election 2024 : जरांगे फॅक्टरचा फटका भाजपाला बसणार! एक्झिट पोलचे आकडे...

Maharashtra Election 2024 : जरांगे फॅक्टरचा फटका भाजपाला बसणार! एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Subscribe

 मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. असे असले तरी त्यांनी अनेकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता होती. मात्र आता समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. असे असले तरी त्यांनी अनेकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता होती. मात्र आता समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे फॅक्टर कुठेतरी कमी पडला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (BJP is the largest party in the exit polls that have emerged in the backdrop of Maharashtra assembly elections)

मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केले. मात्र आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी अखेर निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या. त्यामुळे मनोज जरांगे स्वत: कुठे निवडणूक लढवणार किंवा मराठा समाजाचे किती लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मनोज जरांगे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर शरद पवार यांनी म्हटले होते की, याचा फायदा आम्हाला होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य केले होते. यानंतर आज मतदानाच्या दिवशी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आवाहन केले.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra exit poll : विधानसभेला शिंदे की ठाकरे, कोण ठरतंय वरचढ? एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे

मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, योग्य माणूस निवडण्याची हीच संधी आहे. आपल्या लेकराच्या आणि आरक्षणाच्या बाजूने मतदान करा. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुमच्या मनाने तुम्हाला जे करायचे ते करा, कारण मालक तुम्ही आहेत. पण मी कोणाजवळ फोटो काढला, याचा अर्थ मी त्याला पाठिंबा दिलेला नाही. मी कुठे टीम पाठवली नाही, कुठे मेसेज किंवा संदेश पाठवलेला नाही. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधले नाही, त्यामुळे तुम्हाला ज्याला वाटेल त्याला मतदाना करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले होते. यानंतर आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

- Advertisement -

एक्झिट पोलमध्ये भाजपाला अधिक जागा

दरम्यान, चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला राज्यात 90 पेक्षा अधिक जागा मिळताना दिसत आहेत. यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला 48 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 22 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. काँग्रेसला 63 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला 40 पेक्षा जास्त जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 35 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर महायुतीला 152 ते 160 जागा आणि महाविकास आघाडीकला 130 ते 138 जागा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात, मात्र मतदानाच्या दिवशीच भानामतीचा प्रकार

Edited By Rohit Patil


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -