Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले...

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…

Subscribe

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने तक्रार केल्यानंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व घडामोडीवर आता राज्याचे गृहमत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये येऊन पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने तक्रार केल्यानंतर विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व घडामोडीवर आता राज्याचे गृहमत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis first reaction to Vinod Tawde allegations of distributing money)

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जेव्हा निवडणुकीमध्ये पराभवा दिसायला लागतो, त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातलाच हा प्रकार आहे. विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्याच्याजवळ कुठलाही पैसा किंवा आक्षेपार्ह गोष्ट सापडली नाही. उलट विनोद तावडे आणि नालासोपाऱ्याचे आमचे जे उमेदवार आहेत, राजन नाईक यांच्यावर हल्ला झालेला आहे. एकूणच महाविकास आघाडीची जी इको सिस्टिम आहे, तिने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे, त्यात थोडी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला आहे. विनोद तावडे या प्रकरणात कुठेही दोषी नाहीत. त्यांनी कुठलेही पैसे नेले नाहीत, वाटले नाहीत किंवा त्यांच्याजवळ पैसे सापडले नाहीत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : देशमुखांवरील हल्ला म्हणजे सलीम जावेदची स्टोरी; फडणवीसांनी उडवली खिल्ली

विरारच्या विवांता हॉटेलमध्ये काय घडले?

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नालासोपाऱ्याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हातामध्ये एक लाल रंगाची डायरी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, हे नमूद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओमध्ये बविआचे कार्यकर्ते हे भाजपा नेते विनोद तावडे यांच्याकडून काळ्या रंगाची बॅग खेचत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी विवांता हॉटेलमध्ये वबिआच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा करत विनोद तावडे यांना घेराव घातला. ज्यानंतर तावडेंनी त्या ठिकाणाहून निघून जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र बविआच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना तिथून जाऊ न देता तुम्ही इथे नेमके कशाला आलात? हा तुमचा मतदारसंघ नाही आणि बाहेरच्या नेत्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मतदारसंघात यायचे नसते, हे नियम माहीत नाही का? असा प्रश्न बविआच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोर उपस्थित करण्यात आला. तसेच, या राड्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैशांची पाकिटे फाडत 500 रुपयांच्या नोटाही दाखवल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -