Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Devendra Fadnavis : मनिषा चौधरी पाहिजेत की खिचडी चोर? फडणवीसांचा मतदारांना सवाल

Devendra Fadnavis : मनिषा चौधरी पाहिजेत की खिचडी चोर? फडणवीसांचा मतदारांना सवाल

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त तीन दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवार मनिषा चौधरी यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दहिसर विधानसभा मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त तीन दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवार मनिषा चौधरी यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दहिसर विधानसभा मतदारसंघात होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. (Devendra Fadnavis targets Thackeray group calling him Khichdi Chor during Manisha Chaudhary campaign)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनिषा चौधरी यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. मला जर कोणी प्रश्न विचारला की, मुंबईमध्ये सातत्याने जनतेत राहणारे आणि जनते करता संघर्ष करणारे पहिले तीन आमदार कोण? तर मी त्यात मनिषा चौधरी यांचं नाव घेईल. कारण मुंबईत एका मतदारसंघामध्ये सर्वाधिक घरं देणारा कोणी आमदार असेल, तर त्या आमच्या मनिषा चौधरी आहेत. पाच हजारच्या वर त्यांनी घरे दिली आहे. याशिवाय बंद पडलेली एसआरए योजना देखील त्यांनी सुरू केली आहे. त्यांनी माझ्याच हस्ते जवळजवळ 1284 घराचं भूमीपूजन केलं. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या घरं देत आहेत. मनिषा चौधरी तुम्ही चिंता करू नका, तुमच्या माध्यमातून जेवढे अडकलेले प्रकल्प असतील किंवा तुमच्या समोरच्या उमेदवाराकडून अडकवलेले प्रकल्प असतील ते माझ्याकडे घेऊन या, तो प्रत्येक प्रकल्प मी सुरू करून दाखवेन. जो जनतेचे पैसे लुबाडेल, घरांचे पैसे घेऊन पळेल, घरांचं काम करतो सांगून फसवेल त्याला जेलमध्ये मी टाकणार म्हणजे टाकणारचं, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : राहुल गांधींनी सूचना दिल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविडच्या काळामध्ये मनिषा चौधरी यांनी केलेलं काम अद्भूत आहे. स्वत:च्या घरचं दु:ख विसरून मनिषा चौधरी यांनी कोविडमध्ये काम केलं. त्यांनी त्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता गरीबाला जेवण मिळावं, खिचडी मिळाली पाहिजे, म्हणून त्या काम करत होत्या. एकीकडे रस्त्यावर उतरून मनिषा चौधरी खिचडी वाटप होत्या, तर दुसरीकडे उबाठाच्या लोकांनी खिचडी चोरण्याचा प्रकार केला. म्हणून ते आज जेलमध्ये बसलेले आहेत. या लोकांनी कोविडमध्ये गरीबांची खिचडी खाल्ली. या लोकांनी प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाण्याचं काम केलं. कारण त्यांनी बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला. कोविड काळात लोक मरत असताना हे लोक घोटाळे करत होते.

- Advertisement -

उबाठाच्या लोकांना माझा सवाल आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही जे कोविड सेंटर काढले होते, तिथे डॉक्टर नव्हते, डॉक्टरच्या जागी कंपाऊडर काम करत होते. त्या कंपाऊंटमुळे शेकडो लोक मेले. त्यांच्या मृत्यूचा गुन्हा कोणावर नोंदवायचा ते सांगा. मला याचं उत्तर या उबाठाच्या लोकांकडून हवं आहे. एकीकडे काम करणाऱ्या आमच्या मनिषा चौधरी आहेत, तर दुसरीकडे कोविड काळात मलिदा खाणारे महाविकास आघाडीचे आणि उबाठाचे लोक आहेत. त्यामुळे आपल्याला आता विचार करायचा आहे की, कोविड काळात काम करणाऱ्या मनिषा चौधरी पाहिजेत की खिचडी चोर? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना विचारला.

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘गुनसे’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंच्या पक्षाचा फुलफॉर्म


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -