Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Maharashtra Election 2024 : राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांकडे मोर्चा

Maharashtra Election 2024 : राजकीय पक्षांचा अपक्ष उमेदवारांकडे मोर्चा

Subscribe

राज्यात झालेल्या एकूणच मदानानंतर कोणत्याही एका पक्षाला सहज एकहाती सत्ता मिळेल, अशी सध्या तरी परिस्थिती  नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा 145 चा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे निकाल लागण्याच्या आधीच राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांचा मोर्चा निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांकडे वळवल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या विविध राजकीय पक्षांनी आज, बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता त्यांचे लक्ष राज्यात कसे सरकार स्थापन करता येईल, याकडे वळवले आहे. राज्यात झालेल्या एकूणच मदानानंतर कोणत्याही एका पक्षाला सहज एकहाती सत्ता मिळेल, अशी सध्या तरी परिस्थिती  नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा 145 चा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे निकाल लागण्याच्या आधीच राज्यातील राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी त्यांचा मोर्चा निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांकडे वळवल्याचे खात्रीलायकरित्या समजते. (Political parties are now turning to independent candidates to bring power to Maharashtra)

राज्यात गेला महिनाभर महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना रंगला होता. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले वातावरण विधानसभा निवडणुकीत मात्र काहीसे बदलले होते. लोकसभा निवडणुकीत तळागाळापर्यंच झिरपलेला संविधानाचा मुद्या नंतर विधानसभा निवडणुकीसाठ तसा फारसा उपपयोगाचा नसल्याने त्या मुद्यावर निवडणूक लढविण्यावर महाविकास आघाडीला बरीच मर्यादा आलेली दिसली. राज्यातील सत्ताधारी महायुतीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून विरोधकांना काहीसे अडचणीत आणले.

- Advertisement -

निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांकडेही फारसे आक्रमक मुद्दे नसल्याने महागाई, भ्रष्टाचार, बटेंगे तो कटेंगे तसेच व्होट जिहाद यासारखे मुद्दे थोड्याफार प्रमाणात चालले. या सर्वपार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत महायुती वा महाआघाडी यांना जोरदार बहुमत मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. दोन्ही आघाड्यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी अपक्ष आमदारांची गरज भासणार असल्याचे मत राजकीय निरिक्षक नोंदवत आहेत. त्यातूनही जी आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचेल त्यांना त्यांना पुढची पाच वर्षे स्थीर सरकार देण्यासाठी निश्चितच अपक्षांची फौज सोबतील लागणार आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : जरांगे फॅक्टरचा फटका भाजपाला बसणार! एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

- Advertisement -

विधानसभेचा एकदा निकाल लागला आणि अपक्षांची सरकार बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असेल नसे निश्चित झाले की साहजिकच अपक्षांचा भाव वधारणार आहे. अशावेळी त्यांची मर्जी वळविण्यासाठी तारेवरची कसरत करण्यापेक्षा कोणते अपक्ष आमदार निश्चित निवडून येतील, याचा अंदाज बांधत आजपासूनच राजकीय पक्षांचे लोक या अपक्षांना आपल्याकडे वळविण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे समजते. काही राजकीय पक्षांनी तर मतदानाच्या आधीपासूनच याबाबतचा अंदाज बांधत काही जणांना रसद पुरवल्याचे समजते. सोलापूर दक्षिणमध्ये धर्मराज काडाबी, अक्कलकुवामध्ये हिना गावित, रामटेकमध्ये राजेंद्र मुळक, बडनेरामध्ये प्रिती बंड, सांगलीमध्ये जयश्री पाटील, इंदापूरमध्ये प्रविण माने, नांदगावमध्ये समीर भुजबळ अशा अनेक अपक्ष उमेवारांच्या संपर्कात राजकीय पक्ष असल्याचे समजते.

अपक्षांना मुंबईत भेटीसाठी बोलावले?

दरम्यान, राज्यात यावेळेला जवळपास 20 ते 22 अपक्ष आमदार निवडून येतील असा विविध राजकीय पक्षांचा आधीपासूनच व्होरा आहे. साहजिकच सत्तास्थापनेमध्ये यांचा मोठा वाटा असू शकतो हे गृहीत धरून आधीपासूनच अपक्षांना संपर्क साधण्याचा राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर उद्या (21 नोव्हेंबर) काही अपक्षांना मुंबईमध्ये बोलाविण्यात आल्याचेही समजते.

हेही वाचा – Maharashtra exit poll : विधानसभेला शिंदे की ठाकरे, कोण ठरतंय वरचढ? एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -