मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले असून दोन दिवसांनी निकाल लागणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या टक्क्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आता प्रस्थापित नेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Record-breaking turnout in Maharashtra Assembly elections has increased tension among sitting MLAs from 15 constituencies)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 61.29 टक्के मतदान झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत आयोगाने रात्री साडेअकरा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 65.02 टक्के मतदानाची नोंद झाली. ही अंतिम आकडेवारी नाही. त्यामुळे अंतिम आकडेवारी जेव्हा येईल तेव्हा 3 किंवा 5 टक्क्यांनी आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी अनेक जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे कागल मतदारसंघात सर्वाधिक 81 टक्के मतदान झाले आहे. तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे मुंबईत सर्वाधिक कमी मतदान झाले आहे.
मुंबईत शहरात 52.07 टक्के, उपनगरात 55.77 टक्के आणि ठाण्यात 56.05 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. असे म्हटले जाते की, एखाद्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्यास साधारणत: सत्तापालटाचा संकेत समजला जातो. त्यामुळे राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये वाढलेले मतदान प्रस्थापित नेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे आता 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यावर राज्यातील चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा – Maharshtra Election 2024 : मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का वाढला, फायदा की फटका?
टॉप 15 मतदारसंघातील टक्केवारी आणि विद्यमान आमदार
करवीर – 84.01 (काँग्रेस, आमदार दिवंगत पी एन पाटील सडोलीकर)
चिमुर – 81.75 (भाजपा, कीर्तीकुमार भांगडिया)
कागल – 81.72 (अजित पवार गट, हसन मुश्रीफ)
ब्रह्मपुरी – 80.54 (काँग्रेस, विजय वडेट्टीवार)
सिल्लोड – 80 (शिवसेना शिंदे गट, अब्दुल सत्तार)
नेवासा- 79.89 (मविआ-क्रांतिकारी पक्ष, शंकरराव गडाख)
शाहूवाडी – 79.04 (महायुती-जनसुराज्य, विनय कोरे)
पलूस कडेगाव – 79.02 (काँग्रेस, डॉ. विश्वजीत कदम)
नवापूर – 78.70 (काँग्रेस, शिरीष नाईक)
शिराळा – 78.47 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मानसिंग नाईक)
राधानगरी – 78.26 (शिवसेना शिंदे गट, प्रकाश आबिटकर)
शिरोळ – 78.06 (शिवसेना शिंदे गट, राजेंद्र पाटील यड्रावकर)
सांगोला – 77.90 (शिवसेना शिंदे गट, शहाजीबापू पाटील)
दिंडोरी – 77.75 (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, नरहरी झिरवळ)
विक्रमगड – 77.75 (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, सुनिल भुसारा)
हेही वाचा – DCM Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचा प्रभाव किती? फडणवीसांनी स्पष्टच सांगितले