Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Mumbai Politics : मालाडमध्ये शिवसेनेच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा; निरुपम यांचा मुस्लीम कार्यकर्त्यांवर...

Mumbai Politics : मालाडमध्ये शिवसेनेच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा; निरुपम यांचा मुस्लीम कार्यकर्त्यांवर आरोप

Subscribe

बीडनंतर आता मुंबईच्या मालाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांनी ठाकरे गटाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण 288 मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे, मात्र काही ठिकाणी गोंधळ आणि राडा झालेला पाहायला मिळत आहे. बीडनंतर आता मुंबईच्या मालाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. (Sanjay Nirupam alleges that Muslim activists of Thackeray group beat him up in Malad)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्वेला असलेल्या पठाण वाडीत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या  कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सुनील प्रभू हे मागच्या दोन टर्मपासून आमदार आहेत. त्यांना आता हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. पण काँग्रेसमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या संजय निरुपम यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संजय निरुपम यांच्यारुपाने सुनील प्रभू यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. मात्र आज मतदानादिवशी या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राड झाला.

- Advertisement -

हेही वाचा – Sharmila Thackeray : आम्ही आरशासमोर निवडणूक लढवत नाहीय; शर्मिला यांची आदित्य यांच्यावर टीका

दिंडोशी विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांचा प्रभाव आहे. मात्र या ठिकाणी काही मुस्लीम समाजाचे लोकही राहतात. आज मतदानाच्या दिवशी ठाकरे गटाच्या मुस्लीम कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने मत देण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मी तिथे पोहोचलो तेव्हा मुस्लीम समाजातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. हे निवडणूक आयोगाचे उल्लंघन आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले. मी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यास मी पोलीस स्टेशनला जाऊन कारवाईची मागणी करणार आहे, अशी भूमिका संजय निरुपम यांनी स्पष्ट केली.

- Advertisement -

दुपारी 05 वाजेपर्यंतचे मुंबईत किती मतदान?  

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 05 वाजेपर्यंत मुंबई शहरात 49.60 टक्के मतदान झालं आहे. दिंडोशीत 53.54, धारावीमध्ये 46.15 टक्के, सायनमध्ये 50.54, चेंबूरमध्ये 52.07 टक्के, कुलाबामध्ये 41.64 टक्के, मलबारमध्ये 50.08 टक्के, भायखळामध्ये 50.41 टक्के, शिवडीमध्ये 51.70 टक्के, तर माहीममध्ये 55.23 टक्के मतदान झाले आहे. तर, भांडूपमध्ये 60.18 टक्के मतदान झाले आहे. तसेच, अणुशक्ती नगर येथे 49.95 टक्के मतदान झाले आहे. तर, विक्रोळीमध्ये 53 आणि मुलुंडमध्ये 52.2 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : विनोद तावडेंना मिळालेली वागणूक…; राणेंकडून संताप व्यक्त


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -