Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024Sanjay Raut : भाजपाकडे नैतिकता असेल तर तावडेंवर कारवाई करतील, पैसे वाटल्याप्रकरणी...

Sanjay Raut : भाजपाकडे नैतिकता असेल तर तावडेंवर कारवाई करतील, पैसे वाटल्याप्रकरणी राऊतांची टीका

Subscribe

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, आता भाजपाकडे नैतिकता असेल तर ते विनोद तावडेंवर कारवाई करतील.

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले असून याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. (Sanjay Raut demands BJP to take action against Vinod Tawde for distributing money)

विरारमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी, विरारमध्ये जे घडलं ते कॅमेरासमोर आहे. त्यामुळे खुलासे कसले करता? भाजपाचा खरा चेहरा उघड झाला असून त्याचा निवडणुकीतील खेळ संपला आहे. विनोद तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे 5 कोटी रुपये पकडण्यात आले. ते हॉटेलमध्ये पैशाचं वाटप करत असताना बहुजन विकास आघाडीचे लोकं तिथे पोहचले आणि त्यांनी पैसे जप्त केले. त्यांनी तावडेंच्या तोंडावर पैसे फेकले, गोंधळ घातला आणि विनोद तावडेंना खोलीत कोंडून ठेवले. यावर भाजपा काय खुलासा करणार आहे? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : तावडेंबद्दल भाजपाच्या प्रमुख नेत्यानेच ठाकुरांना टीप दिली; राऊतांचा रोख कोणाकडे?

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात किमान 15-20 कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोहचले. आज नाशिकला भाजपा आणि शिंदे गटाचे पैसे पकडले. मुंबईमध्ये पैसे वाटण्यासाठी ठाण्यातून खास माणसांची नेमणूक झाली आहे. ठाणाच्या बाजूला ईशान्य मुंबई आहे. तिथे एकनाथ शिंदेंचा राम नेपाळे नावाचा एक व्यक्ती आहे. तो रात्री पैसे घेऊन येतो, त्या भागात पैसे वाटप करतो आणि पोलीस बंदोबस्तात पोलीस बंदोबस्तात परत ठाण्यात जातो. राम नेपाळे हे नाव लक्षात ठेवा, कारण 23 तारखेनंतर त्याचं काय करायचं ते मी बघणार आहे. पैसे वाटप करणाऱ्या अशा लोकांची माझ्याकडे 18 लोकांची नावं आहे. पण विनोद तावडे स्वत: पैसे वाटत करत आहे, हे आश्चर्य आहे. त्यामुळे आता भाजपाकडे नैतिकता असेल तर ते विनोद तावडेंवर कारवाई करतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -