Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024UP By-Elections : आयोगाच्या आदेशानंतर सात पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; काय आहे कारण?

UP By-Elections : आयोगाच्या आदेशानंतर सात पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; काय आहे कारण?

Subscribe

आजच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या सर्व निवडणुकीचा निकाल येत्या 23 तारखेला लागणार आहे. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशमध्ये सात पोलिसांवर तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात विधानसभेसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडले. आजच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्येही पोटनिवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या सर्व निवडणुकीचा निकाल येत्या 23 तारखेला लागणार आहे. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशमध्ये सात पोलिसांवर तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. (Seven policemen suspended in Uttar Pradesh after Election Commission order)

यूपीमध्ये आज 9 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. समाजवादी पक्षाच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने सात पोलिसांना निलंबित केले आहे. यात कानपूरमध्ये सर्वाधित पाच पोलिसांचे निलंबन केले आहे, तर अरुण सिंह आणि राकेश नाडर या दोन निरीक्षकांना सिसामऊमध्ये निलंबित करण्यात आले आहे. मतदारांशी गैरवर्तन आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर या सर्वावर आरोप आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त अखिल कुमार म्हणाले की, काही पोलीस निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नसल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असेही अखिल कुमार यांनी सांगतिले.

- Advertisement -

हेही वाचा – Ramdas Athawale : मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत दुजाभाव, आयोगाकडे तक्रार; नेमकं काय घडलं?

निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश 

पोटनिवडणुकीत काही समुदायांना मतदान करण्यापासून रोखले जात असल्याची माहिती समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर दिली होती. याची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी, सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना निष्पक्षता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कडक सूचना दिल्या. अधिकाऱ्यांना सर्व तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यास तसेच तक्रारदाराला सोशल मीडियाद्वारे टॅग करून माहिती देण्यास सांगण्यात आले. कोणत्याही पात्र मतदाराला मतदान करण्यापासून रोखू नये आणि कोणत्याही प्रकारची भेदभावाची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. तक्रार आल्यानंतर कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करावी, असे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

अखिलेश यादव यांनी केले होते ट्वीट

दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, ज्या मतदारांना आधी मतदान करण्यापासून रोखण्यात आले होते, त्यांना आम्ही पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करतो आहोत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याशी बोलून व्हिडीओ आणि फोटो पुराव्याच्या आधारे भ्रष्ट व पक्षपाती पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच उर्वरित दोषी अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, सपाचे उमेदवार हाजी रिझवान यांनी कुंडरकी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप करत हाजी रिझवान यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

हेही वाचा – Maharashtra Exit Poll : महायुती की महाविकास आघाडी, कोण येणार सत्तेत? ‘चाणक्य’चा मोठा एक्झिट पोल समोर


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -