Maharashtra Assembly Election 2024
घरविधानसभा 2024SS UBT : विजयाचे देणे नम्रतेने पेलवता येईल काय? ठाकरे गटाचा नवनिर्वाचित...

SS UBT : विजयाचे देणे नम्रतेने पेलवता येईल काय? ठाकरे गटाचा नवनिर्वाचित आमदारांना प्रश्न

Subscribe

भाजपा 149 जागांवर निवडणूक लढून 132 जागांवर विजयी झाला. हा त्यांचा स्ट्राईक रेट की काय म्हणायचा तो सनसनाटी आहे. राजकारणातील विद्वान मंडळींना यावर विशेष संशोधन करावे लागेल. लोकसभेला भाजपाचा हा ‘रेट’ साधारण 32 टक्के होता, तो चार महिन्यांत 88.59 टक्के झाला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

(SS UBT) मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अनाकलनीय आहेत, यावर सगळ्यांचेच एकमत बनले आहे. या सगळ्यात स्वतः भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीसदेखील आहेत. भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मिळालेल्या छप्परफाड जागा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याचे फडणवीस यांनी मान्य केले. महाराष्ट्रातील ‘विजय’ हा महायुतीसह सगळ्यांसाठी अभूतपूर्व आहे, पण विजयाचे हे देणे विजयवीरांना नम्रतेने पेलवता येईल काय? असा थेट सवाल ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group’s question to newly elected MLAs)

दोन राज्यांत निवडणुका झाल्या. झारखंडचा निकाल हा हेमंत सोरेन यांच्या बाजूने लावला तसेच महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि राजकीय, आर्थिकदृष्ट्या मोठ्या राज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यापारी लॉबीने ‘ताबा’ मिळवला. या मंडळींनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्र राज्य जिंकले यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मोदींना घराणेशाहीची यादी हवी असेल तर…, ठाकरे गटाची खोचक टीका

भाजपा 149 जागांवर निवडणूक लढून 132 जागांवर विजयी झाला. हा त्यांचा स्ट्राईक रेट की काय म्हणायचा तो सनसनाटी आहे. राजकारणातील विद्वान मंडळींना यावर विशेष संशोधन करावे लागेल. लोकसभेला भाजपाचा हा ‘रेट’ साधारण 32 टक्के होता, तो चार महिन्यांत 88.59 टक्के झाला. भ्रष्टाचार आणि लोफरगिरी करण्याच्या अपराधाबद्दल अमेरिकेत न्यायालयाने अटक वॉरंट काढले असताना मुंबईच्या शेअर बाजारात अदानीचा भाव वाढावा तसाच हा प्रकार, पण मोदी है तो सर्व काही मुमकीन असल्याने हे अनाकलनीय निकाल स्वीकारायचे असतात, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, आडाम मास्तर, कॉ. जिवा पांडू गावीत, वैभव नाईक, राजन साळवी यांच्यासारखे लोकाभिमुख उमेदवार तसेच नेते पडतात आणि अनेक ‘थुकरट’ उमेदवार विजयी केले जातात. महाराष्ट्रात भाजपाने ऐतिहासिक वगैरे कामगिरी केली असे मोदी म्हणतात. पण हे पिचक्या पाठकण्याचे आणि स्वाभिमानाची जाण नसलेले लोक मोदी समर्थक म्हणून निवडून आले. ते महाराष्ट्रावरील संकटाशी सामना कसा करतील? असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला आहे. (SS UBT : Thackeray group’s question to newly elected MLAs)

हेही वाचा – Maharashtra Election Reuslts 2024 : निकाल संशयास्पद आहेत तरीही.., ठाकरे गट काय म्हणाला?


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -