घरमहा @४८७ - अमरावती लोकसभा मतदारसंघ

७ – अमरावती लोकसभा मतदारसंघ

Subscribe

अमरावती जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. अमरावती तालुका, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरुड, धारणी, चिखलदरा, चांदुर रेल्वे, धामणगांव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, भातकुली यानुसार त्याचे विभाजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.

मतदारसंघाचा क्रमांक – ७

- Advertisement -

नाव – अमरावती

संबंधित जिल्हा – अमरावती

- Advertisement -

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेती पीक – ज्वारी

शिक्षणाचा दर्जा – ८८.२३ टक्के


मतदारसंघ राखीव – (SC)

एकूण मतदार – १० लाख ०१ हजार ०६३

महिला – ४ लाख ४६ हजार ४१४

पुरुष – ५ लाख ५४ हजार ६४९


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

नवनीत रवी राणा -अपक्ष – ५ लाख १० हजार ९४७

आनंदराव अडसूळ – शिवसेना – ४ लाख ७३ हजार ९९६

गुणवंत देवपरे – वंचित बहुजन आघाडी – ६५ हजार १३५

विजय विल्हेकर – अपक्ष – १० हजार ५६५


अमरावती विधानसभा मतदारसंघ

अमरावती जिल्हा

३७ बडनेरा – रवी राणा, अपक्ष

३८ अमरावती – डॉ. सुनील देशमुख, भाजप

३९ तिवसा – अॅड. यशोमती ठाकुर, काँग्रेस

४० दर्यापूर (SC) – रमेश बुंदेले, अपक्ष

४१ मेळघाट (ST) – प्रभुदास भिलावेकर, भाजप

४२ अचलपूर – बच्चू कडू, अपक्ष


आनंदराव अडसूळ, शिवसेना

विद्यमान खासदार – आनंदराव अडसूळ, शिवसेना

लोकसभेतील शिवसेनेचे गटनेता आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या सौभाग्यवती नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना यापूर्वीच्या निवडणुकीत तगडे आव्हान दिले होते. ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी लाभलेला अन् अनुसूचित प्रवर्गांसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा देशभरातील चर्चित मतदारसंघांपैकी एक. शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील, केरळ, बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार असेल. हा मतदारसंघ अडसुळांचा असला तरी अडसूळ मात्र अमरावतीचे नाहीत. सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात अडसूळ हे बुलडाणा मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात पोहोचले. तत्पूर्वी ते बुलडाण्याचे खासदार होते. राखीव आणि सुरक्षित मतदारसंघ हे अडसूळ यांच्या राजकारणातील अग्रणी सूत्र. त्यामुळे आनंदराव अडसुळांनी यावेळी पुन्हा मतदारसंघ बदलल्यास आश्चर्य वाटू नये.

२०१४ मधील मतांची आकडेवारी

आनंदराव अडसूळ, शिवसेना – ४ लाख ६७ हजार २१२

नवनीत रवी राणा, काँग्रेस – ३ लाख २९ हजार २८०

गुणवंत देवपरे, बसपा – ९८ हजार २००

नोट – ४ हजार ११२

मतदानाची टक्केवारी – ६२.२६ टक्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -