४३ – माढा लोकसभा मतदारसंघ

Madha lok sabha constituency map
माढा लोकसभा मतदारसंघाची रचना

राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांनी ७६,०६० मतांनी आघाडी घेतली असून भाजपचे रणजितसिंग नाईक-निंबाळकर ७३,९४८ मतांनी पिछाडीवर आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील माढा हा लोकसभा मतदारसंघ २००९ च्या पुनर्रचनेनंतर निर्माण झाला. पंढरपूर या आधीच्या मतदारसंघाचे विभाजन होऊन माढा मतदारसंघाची निर्मिती झाली होती. माढा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यादांच शरद पवार यांनी इथून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस तर सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण हे विधानसभेचे मतदारसंघ मोडतात.

माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. करमाळ्यात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचा अपवाद वगळता इतर मतदारसंघावर दोन्ही काँग्रेसची पकड आहे. माढा, माळशिरस, फलटनमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पुरस्कृत शेकपाचे आमदार गणपतराव देशमुख आहेत. साताऱ्यातील माण मतदारसंघात काँग्रेसचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत.

माढा हा तसा साखरपट्ट्यातील मतदारसंघ आहे. मात्र तरिही सांगोला, माण सारखे दुष्काळी तालुके इथे आहेत. उद्योग व्यवसाय फारसे नसल्याने सुशिक्षित तरुणांची बेरोजगारीची संख्या देखील मोठी आहे.


मतदारसंघ क्रमांक – ४३

नाव – माढा

संबंधित जिल्हा – सोलापूर, सातारा

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या (२०१४) – १७ लाख १९ हजार ९९२

पुरुष – ९ लाख ७ हजार ५१७

महिला – ८ लाख १२ हजार ४७१


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

रणजितसिंह हिंदुराव नाईक- निंबाळकर – भाजप -५ लाख ८६ हजार ३१४

संजयमामा विठ्ठलराव शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस – ५ लाख ५५०

अॅड. विजयराव मोरे – वंचित बहुजन आघाडी – ५१ हजार ५३२

दौलत उमाजी शितोळे – अपक्ष – १२ हजार ८६९

आप्पा आबा लोकरे – बहुजन समाज पार्टी – ६ हजार ८८३


माढा मधील विधानसभा मतदारसंघ

सोलापूर

२४४ करमाळा – नारायण पाटील, शिवसेना

२४५ माढा – बबनराव शिंदे, राष्ट्रवादी

२५३ सांगोला – गणपतराव देशमुख, शेकाप

२५४ माळशिरस (SC) – हनुमंत डोळस, राष्ट्रवादी

सातारा

२५५ फलटण (SC) – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी

२५८ माण – जयकुमार गोरे, काँग्रेस


 

Vijaysinh Mohite Patil
खासदार विजयसिंह मोहिते पाटील

विद्यमान खासदार – विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे २०१९ साठी या मतदारसंघातून उमेदवारी घेणार नाहीत, हे आतापर्यंत निश्चित झाले आहे. शरद पवारच या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात पक्षातंर्गतच नाराजीचे सूर उमटलेले होते. मोहिते पाटलांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, तसेच माजी आमदार दीपक आबा साळुंखे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून होते. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटिल यांच्याविरोधी वातावरण झाल्यामुळे ही मतदारसंघ गमावण्यापेक्षा शरद पवार यांनी इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
२००९ साली शरद पवार यांनी माढातून ५ लाख ३० हजार ५९६ मते मिळवली होती. तर सुभाष देशमुख २ लाख १६ हजार १३७ मते मिळवून दुसऱ्या क्रमाकांवर होते. त्यामुळे लाट कोणतीही असली तरी शरद पवार लोकसभा जिंकतील यात मात्र शंका नाही.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी – ४ लाख ८९ हजार ९८९

सदाभाऊ खोत, स्वाभिमानी पक्ष – ४ लाख ६४ हजार ६४५

कुंदन बनसोडे, बसपा – १५ हजार ७७४

प्रतापसिंह मोहिते पाटील – २५ हजार १८७

नोटा – ४ हजार २०९