३० – दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

असा आहे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ...

Mumbai South Central Loksabha Constituency
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

मुंबई उपनगरातल्या चेंबूरचा काही भाग सोडला तर हा मतदारसंघ प्रामुख्याने मराठी बहुल आहे. इथे शिवसेना भवन असल्यामुळे शिवसेनाही आपली सगळी ताकद लावून हा मतदारसंघ राखण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे १९९१पासून फक्त एकदाच २००९मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाडांनी इथे काँग्रेसचा झेंडा फडकावला होता. उर्वरीत ६ निवडणुकांमध्ये शिवसेनेनं आपला गड कायम राखला आहे. शिवाय दादर टर्मिनस, आशियातली सर्वात मोठी धारावी झोपडपट्टी, मूळ मुंबईकरांच्या मध्य मुंबईतल्या वसाहती यामुळे हा मतदारसंघ कायमच हॅपनिंग राहिला आहे. इथल्या मराठी मतांचं पारडं कुणाच्या बाजूने झुकणार? यावर इथले निकाल अवलंबून असतात. पण असं असलं, तरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ३, काँग्रेस २ आणि भाजप १ असं गणित आहे. शिवाय यावेळी मोदी लाटदेखील नसल्यामुळे शिवसेनेचा गड काबीज करण्याचा निर्धार विरोधक करत आहेत.

मतदारसंघाचा क्रमांक – ३०

नाव – दक्षिण-मध्य मुंबई

संबंधित जिल्हे – मुंबई उपनगर, मुंबई शहर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – कर्मचारी-नोकरदार, लघुउद्योग

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ८२%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ७ लाख ६८ हजार १३०

महिला मतदार – ३ लाख ४३ हजार ७९०

पुरुष मतदार – ४ लाख २४ हजार ३१०


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

राहुल शेवाळे शिवसेना – ४ लाख २४ हजार ९१३

एकनाथ गायकवाड काँग्रेस – २ लाख ७२ हजार ७७४

संजय सुनिल भोसले वंचित बहुजन आघाडी – ६३ हजार ४१२

नोटा १३ हजार ८३४


विधानसभा मतदारसंघ – आमदार

मुंबई उपनगर मतदारसंघ

१७२ – अणुशक्ती नगर – तुकाराम काटे, शिवसेना

१७३ – चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना

मुंबई शहर मतदारसंघ

१७८ – धारावी (अ.जा.) – वर्षा गायकवाड, काँग्रेस

१७९ – सायन-कोळीवाडा – तमिल सेल्वम, भाजप

१८० – वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस

१८१ – माहीम – सदा सरवणकर, शिवसेना


Shivsena MP Rahul Shevale
शिवसेना खासदार राहुल शेवाळे

विद्यमान खासदार – राहुल शेवाळे, शिवसेना

२०१४मध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड यांचा मोदी लाटेत राहुल शेवाळेंनी पराभव केला. ते थेट मुंबई महानगरपालिकेतून संसदेत गेले. पण तरी जवळपास अडीच लाख मतं घेऊन एकनाथ गायकवाडांनी कडवी टक्कर दिली होती. त्यामुळेच यंदा मोदी लाट नसताना फक्त मराठी मतांच्या जोरावर हा मतदारसंघ राखणं शेवाळेंसमोर मोठं आव्हान असणार आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्विकास, दादर रेल्वे स्थानकावरच्या सोयीसुविधा, कोळीवाड्यांच्या विकासाचा पाठपुरावा अशा काही दाव्यांच्या आधारावर निवडून येण्याची खात्री राहुल शेवाळे व्यक्त करत आहेत. पण हेच दावे खोडून काढत जनसंपर्काच्या आधारावर एकनाथ गायकवाडांनीही मोहीम उघडली आहे. शिवाय तिकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपानुसार तिकीट कुणाला मिळतं यावर इथला सामना आणि त्याचा निकाल अवलंबून असेल.

२०१४मधील आकडेवारी

राहुल शेवाळ – शिवसेना – ३ लाख ८१ हजार ००८

एकनाथ गायकवाड – काँग्रेस – २ लाख ४२ हजार ८२८

आदित्य शिरोडकर – मनसे – ७३ हजार ०९६

सुंदर बालाकृष्णन – आप – २७ हजार ६८७

नोटा – ९ हजार ५७१

मतदानाची टक्केवारी – ५३.०९%